शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

टपरीत पान नव्हे.. मिळतेय चक्क दारू : राजवाड्यावरील भरवस्तीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 23:11 IST

सातारा : सातारकर साखरझोपेत असतानाच राजवाड्यावरील भरवस्तीत असणाऱ्या एका पानटपरीमध्ये चक्क दारूची विक्री केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर ...

ठळक मुद्देविकण्याची वेळ फक्त पहाटेचीच

सातारा : सातारकर साखरझोपेत असतानाच राजवाड्यावरील भरवस्तीत असणाऱ्या एका पानटपरीमध्ये चक्क दारूची विक्री केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सकाळी साडेआठनंतर टपरीमध्ये इतर साहित्य विकले जात आहे. मात्र, तरीही याची पोलिसांना कशी भणक लागली नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

राजवाडा हा साताºयाचा ऐतिहासिक ठेवा आहे. या परिसराचे पावित्र्य राखणे हे समस्त सातारकरांबरोबरच पोलिसांचेही कर्तव्य आहे. असे असताना अवैध व्यवसायांमुळे ऐतिहासिक परिसराला गालबोट लागण्यासारखे प्रकार अलीकडे सातत्याने घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी याच राजवाडा परिसरात असणाºया एका पानटपरीमध्ये पोलिसांना दोन जिवंत काडतुसे सापडली होती. त्यामुळे पानटपरीमध्ये अवैध व्यवसायाची पाळेमुळे खोलवर रोवत असल्याचे यातून आता समोर येऊ लागले आहे.

राजवाडा परसिरात गेल्या काही महिन्यांपासून एका व्यक्तीने पानटपरी सुरू केली आहे. ही पानटपरी सकाळी साडेसहा वाजता उघडली जाते. सकाळी या पानटपरीवर लोकांच्या रांगा लागत असल्याचे काही जागृत नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पानटपरीमध्ये थोडे डोकावून पाहिले असता चक्क त्या रांगा दारू पिण्यासाठी लागत असल्याचे निदर्शनास आले. हे पाहून अनेकांना धक्काच बसला. एवढ्या भल्या पहाटे लोक दारू पिण्यासाठी पानटपरीवर गर्दी करत असल्याची माहिती पोलिसांना कशी नाही, असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय.

संबंधित पानटपरीवर बाहेर कुरकुरे, बडीशेपच्या पुड्या लटकवलेल्या निदर्शनास येतात; परंतु आतमध्ये दारूने भरलेले कॅन ठेवले गेले असल्याचे काही नागरिकांनी पाहिले आहे. पहाटे साडेसहा ते सकाळी साडेआठपर्यंतच या ठिकाणी दारूची विक्री केली जात आहे. इतर शेजारील लोकांनी आपापली दुकाने उघडल्यानंतर या पानटपरीतील दारू विक्री बंद करण्यात येते. त्यानंतर मात्र, पानटपरीसमोर पाहायला मिळतात ते केवळ पिचकारी मारणारे लोक.ड्राय डेला हाऊसफुल्ल..शासनाकडून ज्या दिवशी ड्राय डे जाहीर केला जातो, त्या दिवशीही पानटपरी म्हणे हाऊसफुल्ल असते. शहराच्या उपनगरातूनही लोक या ठिकाणी येत असतात. मात्र, या टपरीवर पोलिसांकडून कारवाई कशी होत नाही, हेच न उलगडणारं कोडं आहे. पानटपरीच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैधधंद्यांचा पोलिसांनी बिमोड करावा, अशी मागणीही यानिमित्ताने नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbusinessव्यवसाय