शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळं गुळाला मिळेना गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:04 IST

आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सातारा, सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यात पूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील गु-हाळघरांना घरघर, गूळ हंगामाची बिकट स्थिती उत्पादनात मोठी घट

स्वप्नील शिंदे ।सातारा : यंदाच्या साखर हंगामाची सुरुवात जशी खडतर सुरू आहे, त्याहीपेक्षा बिकट स्थिती गूळ हंगामाची आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील गुºहाळघरांना घरघर लागली असून, गुºहाळघरांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याच्या आसपास येऊन ठेपली आहे. त्यात महापूर, अतिवृष्टीमुळे गुºहाळघरांची पडझड आणि चुलवाणासाठी आवश्यक असलेले जळण भिजले आहे. त्यात ऊस पाण्याखाली गेल्याने त्यातून गुळाला गोडवा मिळत नसल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सातारा, सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यात पूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते. तसेच काही गुºहाळांची पडझड झाली. या संकटातून सावरून अनेक गुºहाळ चालकांनी गुºहाळ चालू केली. मात्र, आॅक्टोबर महिन्यात दररोज पडत असलेल्या पावसामुळे गुºहाळासाठी आवश्यक असलेले साहित्य भिजून गेले.

दरवर्षी साधारण गौरी-गणपती व दसऱ्याच्या मुहूर्तावर गुºहाळ चालू होत असतात. मात्र, यंदा परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतातून ऊस बाहेर काढताच येत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर गुºहाळ सुरू झाली. अनेक दिवस ऊस पाण्याखाली गेल्याने त्यातील गोडवा गायब झाला आहे. त्यामुळे गूळ उत्पादनासाठी गुºहाळघरात दरवर्षी सरासरी एका आदणात २०० ते २५० किलो गूळ तयार होत होता. परंतु सद्य:स्थितीत एका आदणासाठी दीड टन ऊस लागतो. त्यातून १4० ते १७० किलो गूळ तयार होतो. सध्या बाजारपेठेत सरासरी प्रतिक्विंटल ३२०० ते ४००० रुपये दर मिळतो. प्रत्यक्षात शेतकºयाला एका आदणामागे वाहतूक, मजुरी, रसायने, घाणा भाडे आदींसह ८००० ते ८५०० रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे मिळणारे उत्पन्न ६००० ते ६५०० रुपयांपर्यंतच आहे. एका आदणामागे ११०० ते १२०० रुपयांचा तोटा होत आहे.

दर मिळत नसल्याने जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी पर्यंत असलेली गुºहाळघरांची संख्या ५० पर्यंत कमी झाला आहे. भविष्यात गु-हाळघरे शोधायची वेळ येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने गुºहाळांना मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे

साखर कारखान्याला ऊस घातला तर एफआरपीनुसार प्रतिटन २८०० ते २९०० रुपये दर मिळतो. मात्र गूळ उत्पादनातील घसरणीमुळे एक टनाला सर्व खर्च धरून फक्त १७०० ते १८०० रुपयेच मिळत आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी गुºहाळघरांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.- बाळासाहेब नलवडे, गूळ उत्पादकमहापूर आणि परतीचा पाऊस यामुळे अजून १० टक्के गुºहाळ सुरू झाली नाहीत. त्यामुळे बाजारात गुळाची म्हणावी अशी आवक होत नाही. मात्र, आवक होणारा गूळही दर्जेदार नाही. त्यामुळे त्यांना तीन ते साडेतीन हजार रुपये दर मिळत आहे.- उत्तमराव जाधव-भाटवडीकर,आडतदार, क-हाड बाजार समितीसध्या गूळ व्यवसायातील अडचणींमुळे पुरता धोक्यात आला आहे. सुरुवातीला हंगामाच्या मुहूर्तावर सौदे काढताना दराचा जो फुगवटा तयार होतो, तो नंतरच्या काही दिवसांत कमालीचा घटतो. सरकारने साखरेला किमान आधारभूत किंमत जाहीर केल्यामुळे २९०० रुपयांच्या खाली साखर विकता येत नाही. शेतकरी गूळ उत्पादित करतो. मात्र व्यापाºयांच्या मनमानीपणावर गुळाचा दर ठरतात.- सचिन नलवडे, रयत क्रांती संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसर