शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

केवळ निवडणुकांसाठी कोणी रस्त्यावर उतरू नका -सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:08 IST

महाबळेश्वर : ‘शेतकऱ्यांंच्या प्रश्नाचे भांडवल करून अनेकांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजल्या; परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत.

ठळक मुद्देमहाबळेश्वरात ‘रयत क्रांती’च्या शिबिराचा समारोप

महाबळेश्वर : ‘शेतकऱ्यांंच्या प्रश्नाचे भांडवल करून अनेकांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजल्या; परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. ज्यांनी राजकारण केले त्यांना खरे तर प्रश्न सोडवायचेच नव्हते. कारण जर प्रश्न सुटले तर यांचे राजकारणाचे दुकान कायमचे बंद होणार, ही भीती त्यांना वाटत होती. केवळ निवडणुकांसाठी रस्त्यावर उतरू नका तर सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढत राहा,’ असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर येथील भाऊसाहेब माळवदे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, उपाध्यक्ष राहुल मोरे, युवा आघाडीचे अध्यक्ष शार्दुल जाधव, सागर खोत, दीपक भोसले, रवींद्र खोत आदी मान्यवर उपस्थित होते.

खोत म्हणाले, ‘येथून गेल्यानंतर तळागाळातील लोकांचे व शेतकºयांचे प्रश्न हाती घ्या. पाणी, आरोग्य, शिक्षण व बेकारी यांचे प्रश्न हाती घ्या. ते सोडविण्यासाठी आक्रमकपणे झोकून देऊन काम करा. वैचारिक संघटन तयार करा. बुद्धिवादी लोकांनाही आपल्या या संघटनेचा हेवा वाटला पाहिजे, त्याचवेळी गुंडांनाही आपल्या संघटनेचा धाक वाटला पाहिजे, अशी संघटना बांधा. मतभेद विसरून संकटात धावून जा. संघटनेतील कोणावर अन्याय झाला तर तो एकाकी पडता कामा नये, अशा पद्धतीने त्याच्या पाठीशी उभे राहा, केवळ निवडणुकांसाठी रस्त्यावर उतरू नका तर सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढत राहा.पक्षांच्या प्रवक्त्यांना आता जागरुकपणे काम करावे लागणार आहे. आपल्या संघटनेला केवळ पाच महिने झाले आहेत. एका वर्षात या रोपट्याचे वृक्षात रुपांतर झालं पाहिजे, असे काम करा, असे आवाहन खोत यांनी केले.कडधान्य देण्याची सक्ती नको..पुढील काही महिने तुम्हाला आंदोलने तीव्र करावी लागणार आहेत. पहिले आंदोलन उसाच्या दरासाठी करा. उसाला एफआरपीप्रमाणे कारखान्यांनी दर दिलाच पाहिजे. यासाठी २८ मे रोजी कारखान्यांवर मोटारसायकल मोर्चा काढा आणि निवेदन द्या. दुसरे आंदोलन कडधान्ये नियमनमुक्त करण्यासाठी करावे लागणार आहे. १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करा. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन द्या. आमच्या शेतात पिकलेले कडधान्य आम्ही कोणालाही विकू शकतो. शेती उत्पन्न बाजार समितीमध्येच कडधान्य देण्याची सक्ती आता या पुढे नको, असेही खोत म्हणाले. 

सर्वांना बरोबर घेऊन काम करारयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या आरोग्य शिबिरास माझ्या आमदार फंडातून दोन लाख रुपयांचा निधी मी देणार असल्याची घोषणा खोत यांनी या शिबिरात केली. रयत क्रांती ही संघटना कोणत्या एका विशिष्ट धर्माची अथवा जातीची संघटना नाही. ही संघटना राज्यातील अठरापगड जाती-धर्मातील लोकांची आहे. शेतकरी, दिन-दलित दुबळ्या कष्टकरी जनतेची आहे. या सर्वांना बरोबर घेऊन समाजात काम करा, असे आवाहनही खोत यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी