शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग ‘वाय-फाय’, नगरसेवक ‘हाय-फाय’!

By admin | Updated: April 24, 2016 23:40 IST

नागरिकांचे गाऱ्हाणे : ठरवून बिनविरोध नगरसेवक लादू नका; लोकशाहीने दिलेला मताधिकार बजावू द्या

सातारा : पालिकेतील दोन्ही सत्ताधारी आघाड्यांचे नेते जेथे राहतात, त्याच प्रभागातील दोन ब्रिटिशकालीन पुलांच्या नूतनीकरणाला वारंवार स्थगिती कशी मिळते? लोकसंख्या आणि रहदारी वाढत चाललेली असताना या अरुंद पुलांवर अपघात झाले तर जबाबदार कोण? अशा प्रश्नांची सरबत्ती कोटेश्वर चौकाजवळील नागरिकांनी केली. तसेच, चार वर्षं वॉर्डात न फिरकणारे नगरसेवक नेत्यांनी आमच्यावर लादू नयेत. आम्हाला लोकशाहीने दिलेला मताधिकार बजावू द्यावा, असे काही नागरिकांनी खुलेपणाने सांगितले.‘लोकमत आपल्या प्रभागात’ या सुमारे पाच महिने सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सांगता रविवारी प्रभाग पाचमध्ये करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांचे ‘जलमंदिर’ आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ‘सुरुची बंगला’ हे निवासस्थान याच प्रभागात आहे. मनोमिलन पॅटर्नमुळे अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, या निवडींना चार वर्षे उलटून गेल्यावर प्रभाग पाचमध्ये काही ठिकाणी समाधान तर काही ठिकाणी रोष दिसून आला. मंगळवार तळे, व्यंकटपुरा पेठ, चिमणपुरा पेठ आदी भागांमधील नागरिकांनी किरकोळ अडचणी वगळता नगरसेवकांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. काही ठिकाणी मात्र बिनविरोध निवडींमुळे समस्यांचे गांभीर्य नगरसेवकांच्या लक्षात येत नसल्याचा सूर आळवण्यात आला. शहरातील या पहिल्यावहिल्या ‘वाय-फाय’ प्रभागातील काही मूलभूत प्रश्न मात्र रखडले आहेत.शुक्रवार पेठेतील कोटेश्वर चौकातून शाहूपुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन मोठे पूल आहेत. हे पूल ब्रिटिशकालीन असून, त्यांची मुदत संपलेली आहे. या पुलांचे रुंदीकरण आणि उंची वाढविण्याचे प्रस्ताव अनेक वर्षे धूळ खात पडले आहेत. नागरिकांच्या सांगण्यानुसार, या पुलांच्या कामाचे तीन वेळा टेंडर निघाले आणि रद्दही झाले. या महत्त्वाच्या कामाला वारंवार स्थगिती मिळतेच कशी, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. कोटेश्वर चौकाकडून ओढ्याकडे जाणारी गटारे खोल आणि उघडी आहेत. तसेच चौकात गतिरोधक नाहीत. पथदिवेही बंद असतात. त्यामुळे येथे वारंवार छोटे-मोठे अपघात होतात. ‘अनेकदा गटारात गेलेल्या दुचाकीस्वाराला आम्ही बाहेर काढतो,’ असे सांगणारे नागरिक येथे भेटले. ‘गेल्या चार वर्षांत नगरसेवक आमच्या गल्लीत फिरकले नाहीत. अनेकांना नगरसेवक कोण हेही माहीत नाही. त्यामुळे नेत्यांनी ठरवून बिनविरोध नगरसेवक यापुढे लादू नयेत. आम्हाला मताधिकार बजावू द्यावा,’ असा सूर काहींनी लावला. मटंगे पुलाजवळील ओढ्यात कचऱ्याचे साम्राज्य, सिटीबसच्या वेळी-अवेळी आणि कमी फेऱ्या, पोस्ट आणि पोलिस चौकीसाठी मंगळवार तळ्याजवळ बांधलेल्या बहुउद्देशीय इमारतीत दोन्ही यंत्रणांची कार्यालये अद्याप नसणे, व्यंकटपुरा पेठेत रात्री-अपरात्री गुरगुरणाऱ्या कुत्र्यांची फौज, अनंत इंग्लिश स्कूल चौकात शाळा सुटल्यावर होणारी गर्दी आणि वेगाने जाणारे बाइकर्स, रामाचा गोट येथील त्रिशंकू स्थिती निर्माण झालेल्या भागातील रखडलेला रस्ता, या रस्त्यावरील अतिक्रमणे, ओढ्यालगत भिंती नसल्याने पावसाळ्यात घरात शिरणारे पाणी, व्यंकटपुरा पेठेत तब्बल ४२ वर्षे रेंगाळलेला ड्रेनेजचा प्रश्न, त्यामुळे डासांची उत्पत्ती आणि आजारांचा धोका, गोखले हौद ते गडकर आळी रस्त्यावर वारंवार तुंबणारी उघडी गटारे, बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाऱ्यांना तक्रारी करूनही मिळणारे अभय अशा काही समस्या नागरिकांनी सांगितल्या. अनेकांना मंगळवार तळ्याचे सुशोभीकरण होऊन एक ‘पिकनिक स्पॉट’ विकसित व्हावा असे वाटते. (लोकमत चमू)