शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा शल्य चिकित्सकांना शिवीगाळ; साताऱ्यात एकाविरोधात गुन्हा दाखल

By नितीन काळेल | Updated: December 16, 2022 15:53 IST

शासकीय कामात आणला अडथळा

सातारा : येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांना शिवीगाळ आणि दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणण्यात आला. याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल जगताप (पूर्ण नाव पत्ता नाही. रा. सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. काल, गुरुवार (दि. १५) दुपारच्या सुमारास हा प्रकार जिल्हा शासकीय रुग्णालयात घडला. संशयिताने जिल्हा शल्य चिकित्सकांच्या केबिनमध्ये येण्यापूर्वी खोली क्रमांक २२ मध्ये अभ्यागत कक्षात बसलेल्या लोकांना शिवीगाळ व दमदाटी केली होती. तसेच तेथील कागदपत्रे आणि फाइल्स विसकटून टाकल्या. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या केबिनमध्ये येऊन शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्की करण्यात आली तसेच शासकीय कामात अडथळा आणला.सातारा शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक मुसळे अधिक तपास करत आहेत.चोरीचाही गुन्हा दाखल...जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील कॅंटीनसमोर संशयिताने टेम्पो चालक मंगेश उमेश चव्हाण (रा. कारंडवाडी, सातारा) याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. परंतु, चव्हाणने नकार दिला. त्यामुळे जगतापने चव्हाणच्या खिशातून जबरदस्तीने ५०० रुपयांची नोट काढून घेतली. याप्रकरणीही सातारा शहर पोलिस ठाण्यात राहुल जगतापविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी