शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ. संजोग कदम यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 14:01 IST

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक पदी डॉ. संजोग कदम यांची राज्य शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर हे दिर्घ रजेवर गेले असल्यामुळे डॉ. कदम यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ. संजोग कदम यांची नियुक्तीअमोद गडीकर रजेवर : कार्यभार सांभाळण्याचे डॉ. कदम यांना आदेश

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक पदी डॉ. संजोग कदम यांची राज्य शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर हे दिर्घ रजेवर गेले असल्यामुळे डॉ. कदम यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी सिव्हिलचा पद्भार सुमारे एक वर्षापूर्वी स्वीकारला होता. मात्र, त्यांना रुग्णालयामधील सुधारणांमध्ये फारसा बदल करता आला नाही. त्यामुळे राज्यात पहिल्या क्रमांकावर आलेले जिल्हा रुग्णालय शेवटच्या यादीत जाऊन बसले.

रुग्णांवर वेळेत अन् योग्य उपचार होत नसल्याने अनेक रुग्णांमधून सातत्याने आरोप होत होते. तसेच सिव्हिलमधील अस्वच्छतेमुळे रुग्ण संख्येत वाढ होत गेली. डॉ. गडीकरांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमधून होत होता. त्यातच डॉ. गडीकरांच्या हाताखालचा लिपिक राजे याला लाच घेताना काही दिवसांपूर्वी एसीबीने पकडले होते. त्यामुळे गडीकर टिकेचे धनी बनले होते. वारंवार ते सुटी घेऊ लागले.

सध्याही ते दिर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. संजोग कदम यांची शासनाने नियुक्ती केली आहे. डॉ. कदम यांना सिव्हिलमधील अनेक वर्षांचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सिव्हिलमध्ये सुधारणा होतील, अशी अपेक्षा सातारकरांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSatara areaसातारा परिसर