कऱ्हाड : घोगाव (ता. कऱ्हाड) येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या बाळसिद्ध विद्यालयात तथागत मित्र मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रा. अभिषेक माने यांची प्रमुख उपस्थिती होती. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना लेखनासाठी व त्यांची शालेय गरज लक्षात घेऊन प्रत्येकवर्षी तथागत मित्र मंडळ व सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत वह्यांचे वाटप करण्यात येते. अभिषेक माने हे आत्मिया युनिव्हर्सिटी राजकोट-राजस्थान यावर बोर्ड ऑफ स्टडीज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मिळणारे मानधन ग्रामीण भागातील आपल्या गावच्या विद्यार्थ्यांसाठी खर्च करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.आणि त्या उपक्रमांतर्गत त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
मळाईदेवी संस्थेकडून गुणवंतांचा सत्कार
कऱ्हाड : मलकापूर येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये यश मिळविले. त्या विद्यार्थ्यांचा सत्कार अशोकराव थोरात यांच्याहस्ते करण्यात आला. भास्करराव मोहिते, विकास काकडे, दमयंती कराळे, अनिल शिर्के, सुनीता सकटे, गुणवंतराव जाधव, परविन बागवान, विश्वास निकम, दिलीप पाटील, शेखर शिर्के, मधुकर जाधव, अर्जुन शिनगारे उपस्थित होते. प्रणाली लावंड, श्रद्धा माने, हर्षवर्धन कदम, स्वरूपा बामणे, वेदांत गाताडे, सुरेश काकडे, तेजस बागल, अथर्व बोरगे, सनतकुमार गावडे, विघ्नेश भावके, सोहम बोंद्रे, श्रीदत्त पाटील, सुजल पाटील, विवेक शिर्के, आशिष गावडे, अथर्व बाकले, मनोज गायकवाड, सुयश माने या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
उंब्रजच्या संजय कुंभार यांचा कालेत सत्कार
कऱ्हाड : काले (ता. कऱ्हाड) येथे उंब्रजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांचा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सुजाता कुंभार, शांताराम कुंभार, दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस नानासाहेब पाटील, नितीन थोरात, देवदास माने, अजित यादव उपस्थित होते. अमित कुंभार यांनी आभार मानले.
बाळसिद्ध विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
कऱ्हाड : घोगाव (ता. कऱ्हाड) येथील बाळसिद्ध विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. अभिषेक माने यांच्याहस्ते त्याचे वाटप झाले. आत्मिया विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडिजचे प्रतिनिधी म्हणून ते काम करतात. त्यातून मिळणाऱ्या मानधनातून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप करतात. मुख्याध्यापक हनुमंत सूर्यवंशी उपस्थित होते. श्रुती सूर्यवंशी, तहसीन मकानदार यांनी मनोगत व्यक्त केले.