शहरं
Join us  
Trending Stories
1
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
2
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
3
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
4
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील ७ वाजता पत्रकार परिषद घेणार
5
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
6
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
7
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
8
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
9
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
10
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
11
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
12
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
13
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
14
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
15
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
16
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?
17
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
18
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
19
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
20
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या

खाकी वर्दीने जाणली सैनिकांची व्यथा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:55 IST

माजी सैनिकांच्या दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या केसेस सोडविण्यासाठी मोठे व्यासपीठ तयार करून दिले. त्यामुळे सैनिकांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या दोन महिन्यांपासून हा मेळावा नित्यनियमाने सुरू आहे.

ठळक मुद्देअडीअडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील पहिल्या मेळाव्याची संकल्पना

दत्ता यादव।सातारा : देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्य दलातील कुटुंबीयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने मेळाव्याची संकल्पना राबविलीय. ही संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदाच साताºयात राबविली जात आहे. यामुळे आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी सैनिक स्कूलच्या मैदानावर महाराष्ट्रातील आजी-माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना निमंत्रित करण्यात आले होते. अधीक्षक सातपुते यांनी सातारा जिल्ह्याचे सैन्य दलातील योगदान लक्षात घेऊन ंकुटुंबाप्रती वेगळी संकल्पना जाहीर केली. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी फक्त माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. केवळ जाहीर करूनच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी मेळाव्याच्या आयोजनाची सुरुवातही केली.

माजी सैनिकांच्या दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या केसेस सोडविण्यासाठी मोठे व्यासपीठ तयार करून दिले. त्यामुळे सैनिकांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या दोन महिन्यांपासून हा मेळावा नित्यनियमाने सुरू आहे. जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय या मेळाव्याला हजेरी लावत आहेत. अनेकांना जागच्या जागी समाधान मिळाले आहे तर काहींना आपल्या तक्रारीबाबत योग्य मार्गदर्शन मिळाले आहे. विशेष म्हणजे, या मेळाव्याला स्वत: पोलीस अधीक्षक उपस्थित राहून सैनिकांच्या कुटुंबीयांना योग्य मार्गदर्शन करत आहेत.

  • तत्काळ आदेश..

जिल्हा पोलीस दलाकडून आयोजित केलेल्या मेळाव्यात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय हजेरी लावत आहेत. यातील गेल्या मेळाव्यात शामराव माने (सातारा) यांनी काहीजणांविरोधात आपली तक्रार असल्याचे सांगितले होते. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. 

  • पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार घेऊन गेल्यानंतर पूर्वी आम्हाला आम्ही माजी सैनिक आहोत, असे सांगावे लागत होते. काही वेळेला आमची ओळख सांगितली नाही तर पोलिसांकडून अपशब्द बाहेर येण्याची शक्यता असते. पोलीस ठाण्यात सैनिकाला आदराची वागणूक मिळेलच, याची शाश्वती नसायची. मात्रा आता पोलीस अधीक्षकांनी सर्वांनाच एकाच छताखाली बोलावून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याने समाधान वाटते. सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी सुरू करण्यात आलेला हा मेळावा, यापुढेही वर्षांनुवर्षे अखंडितपणे सुरू राहावा, एवढीच अपेक्षा असल्याचे माजी सैनिक सुरेश वाघ यांनी सांगितले.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस