शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

धुणी-भांडी करूनही दहावीत मिळविले यश

By admin | Updated: June 18, 2014 01:06 IST

मलकापूरची पूजा ‘हौसाई’मध्ये टॉपर

मलकापूर : पहाटे अभ्यास, सकाळी धुणीभांडी, दिवसभर शाळा आणी रात्री घरकाम अशा परिस्थितीत मलकापुरातील पूजा सुरेश देसाई या विद्यार्थीनीने दहावी परीक्षेत नेत्रदिपक यश मिळविले. पूजाने ७० टक्के गुण मिळवून हौसाई कन्याशाळेत ‘टॉपर्स’मध्ये येण्याचा बहुमान मिळविला. मलकापूरातील शास्त्रीनगरमध्ये पुजा आपली आई मंदा व पुनम, यश, गणेश या तीन भावंडांसमवेत वास्तव्यास आहे. काही वर्षापुर्वी शास्त्रीनगरमधील एका झोपडीवजा शेडात वास्तव्यास असताना पुजाचे वडील सुरेश देसाई यांचे निधन झाले. वडीलांचे छत्र हरपल्यानंतर पुजासह तीच्या कुटूंबाची मोठी वाताहत झाली. वडीलांच्या निधनानंतर पुजा व तीचे कुटूंबिय दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले. वडीलांच्या अचानक जाण्याने घरातील मोठी मुलगी म्हणून सातवीत शिकणाऱ्या पुजावर कुटूंबाची जबाबदारी आली. आई मंदा या मोलमजुरीचे काम करू लागल्या. तर पुजा आईला सर्व कामांमध्ये मदत करीत राहिली. आईसोबत काम करीत असतानाच पुजाने शिक्षणाकडेही लक्ष दिले. सातवी, आठवी व नववीच्या वर्गातही तीने चांगले गुण प्राप्त केले. दहावीत गेल्यानंतर मात्र तीने अभ्यासासाठी वेळ देण्यास सुरूवात केली. आई इतरांच्या घरामध्ये काम करीत असताना पुजा तीला मदत करण्यासाठी जायची. तेथील काम आटोपल्यानंतर दोघी रात्री यायच्या. जेवण आटोपल्यानंतर पुजा अभ्यास करत बसायची. पहाटेही अभ्यासासाठी तीला लवकर उठावे लागत होते. सकाळी आई कामावर निघुन गेली की पुजा घरातील काम आटोपायची. त्यानंतर शाळा व सायंकाळी शाळेतून घरी परत आल्यानंतर आई येईपर्यंत घरातील सर्व काम आटोपण्याची जबाबदारी पुजावर असे. या परीस्थितीतही पुजाने मन लावून अभ्यास केला. (प्रतिनिधी)