शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

स्वच्छतेची माहिती देणार दहिवडीतील बोलक्या भिंती : ग्रामस्थांची फलकातून जनजागृती, अनेक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:52 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायतांनी जोरदार तयारी केली असून, १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अभियानात विविध ठिकाणी संदेश देणारे, लोकांना प्रोत्साहित करणारे

ठळक मुद्दे स्वच्छता अभियान-हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे.

दहिवडी : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायतांनी जोरदार तयारी केली असून, १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अभियानात विविध ठिकाणी संदेश देणारे, लोकांना प्रोत्साहित करणारे डिजिटल फलक लावले असून, सार्वजनिक भिंतीवर स्वच्छतेचे संदेश देणारी माहिती चित्र रंगवली जात आहेत.

गेली दोन दिवस विटा तसेच स्वच्छतेचे संदेश देणारे पथनाट्य सादर करून दहिवडी परिसर ढवळून काढला आहे. महास्वच्छता अभियान होणार असून, हजारो हात पुढे येऊन सर्व परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार दहिवडीकरांनी केला आहे. यासाठी दहिवडीतील तब्बल ६० ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.

यासाठी स्वच्छता साफसफाई करण्यासाठी लागणारी सामग्री गोळा करण्याचे काम नगरपंचायतीने सुरू केले आहे. लोकांना जास्तीत जास्त साहित्य देण्याचा प्रयत्न केला आहे. जनजागृतीसाठी विविध संघटना, शाळा, रिक्षा संघटना प्रशासकीय कार्यालये पतसंस्था महिला बचतगट यांनाही अभियानात सामील करून घेण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कॉलेज, महाविद्यालय माध्यमिक शाळा, खासगी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांना स्वच्छतेची शपथ दिली आहे. महास्वच्छता अभियानाची जय्यत तयारी सुरू आहे.दहिवडीकर सज्ज झाले पाच कोटी बक्षीस मिळविण्यासाठी..स्वच्छतेमध्ये असणारा पाच हजार मार्कांचा पेपर प्रत्येक व्यक्तीला समजावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर करून स्वच्छतेचे अ‍ॅप डाऊनलोड करून या स्पर्धेची माहिती घरोघरी देण्याचे काम सुरू आहे. शहरातील सर्व मंडळी राजकीय गटातटाला फाटा देत दहिवडी शहरासाठी एकत्र येत असून, हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे.

संपूर्ण शहर स्वच्छतेबरोबरच आपला परिसर स्वच्छ ठेवणे, ओला, सुका कचरा वेगवेगळा करून त्यावर प्रक्रिया करणे खतनिर्मिती करणे, सर्व कचरा घंटागाडीत टाकणे या दहिवडीच्या रोजच्या स्वच्छतेची तसेच ५००० मार्कांची पाहणी करणार आहे. दहिवडी नगरपंचायत पूर्ण क्षमतेने उतरून पाच कोटींचे बक्षीस मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान