शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे वाई तालुक्यातील पिकांवर रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 14:22 IST

सततच्या पावसामुळे वाई तालुक्यातील विविध पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याकरिता महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील शास्त्रज्ञ यांनी विठ्ठलवाडी, ता. वाई येथील भात पिकाची पाहणी केली.

ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे वाई तालुक्यातील पिकांवर रोगकृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी : पालाशयुक्त खते वापरण्याचा सल्ला

वाई : सततच्या पावसामुळे वाई तालुक्यातील विविध पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याकरिता महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील शास्त्रज्ञ यांनी विठ्ठलवाडी, ता. वाई येथील भात पिकाची पाहणी केली.या भागातील भात पिकावर करपा व कडा करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रांपिकोनोझॉईल २५ ई. सी २. ५० ग्रॅम प्रति लिटर पाणी व स्टेपोसोसायक्लिन ५ गॅ्रम प्रति पंप याप्रमाणे फवारणी करण्यात यावी. तसेच पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी भात लागणीवेळी पालाशयुक्त खते वापरण्यात यावीत. तसेच यावेळी तज्ज्ञांच्या वतीने पसरणी, शहाबाग, कणूर येथील आले व हळद पिकांची पाहणी केली असता आले व हळद पिकांमध्ये कंदकुज आढळून आली.

कंदकुज नियंत्रणासाठी ट्रायकोर्डमा ५ किलो प्रति एकरी शेणखतांमध्ये मिसळून वापरावा. तसेच वाई तालुक्यातील इतर गावांमध्ये वरील पिकांवरील प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकरी बांधवांनी वरील शिफारशीप्रमाणे उपाययोजना कराव्यात, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी केले.यावेळी तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे वरिष्ठ शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार, संग्राम पाटील, मंडल कृषी पर्यवेक्षक माणिक बनसोडे, कृषी सहायक सुनील चौैधरी व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Satara Floodसातारा पूरSatara areaसातारा परिसर