शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

कोयना धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 20:21 IST

Koyna Dam, satara news, rain सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी पर्जन्यमान कमी असून कोयना, नवजा परिसरात तर चार दिवसांपासून उघडीप आहे. त्यामुळे कोयना धरणात आवक कमी झाल्याने दरवाजानंतर पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोयना धरणातील विसर्ग पूर्णपणे बंदवीजगृहातीलही थांबवला : चार दिवसांपासून पावसाची उघडीप

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी पर्जन्यमान कमी असून कोयना, नवजा परिसरात तर चार दिवसांपासून उघडीप आहे. त्यामुळे कोयना धरणात आवक कमी झाल्याने दरवाजानंतर पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी दमदार पाऊस झाला होता. मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू झाला असलातरी जुलै महिन्यापासून सतत कोसळत होता. आॅगस्ट महिन्यातही दमदार पाऊस झाला. त्यामुळे जवळपास सर्वच धरणे भरली. त्यामुळे सर्वच धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागलेला. त्या तुलनेत यंदा पर्जन्यमान कमी राहिले आहे.

यावर्षी जून महिन्यात वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पण, त्यानंतर पावसात खंड पडत गेला. जुलै महिन्यात तर तुरळक पाऊस झाला. तर आॅगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाल्याने धरणे भरू लागली. मात्र, गतवर्षीपेक्षा यंदा पश्चिम भागात पाऊसमान कमी राहिले आहे.

त्यामुळे धरणांमधून गतवर्षीसारखा विसर्ग झाला नाही. त्यातच चार दिवसांपासून पश्चिम भागात पावसाची उघडीप कायम आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक कमी झालेली आहे.गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर येथे काहीही पाऊस झाला नाही. मात्र, कोयनेला यावर्षी आतापर्यंत ४३३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नवजाला जूनपासून ५०५७ आणि महाबळेश्वरला ५००५ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.कोयनेत १०५.१४ टीएमसी साठा...कोयना धरणात पाण्याची आवक कमी आहे. सकाळच्या सुमारास धरणात १०५.१४ टीएमसी साठा होता. तर धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंदच ठेवण्यात आलेला आहे. तर बुधवारी रात्रीच्या सुमारास पायथा वीजगृहातील विसर्गही थांबविण्यात आला.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर