शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

कोयनेच्या सहा दरवाजांतून ५२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 19:01 IST

Rain KoynaDam Satara : कोयना धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळत असून कोयना धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. कोयनेतील पाणीसाठा ८७.८२ टीएमसी झाला असून कोयना धरणाच्या सहा दरवाजांतून ५२ हजार १७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देआवक वाढली; नवजा, महाबळेश्वरमध्येही संततधार सुरुचजिल्ह्यात सरासरी ११.०६ मिलिमीटर पाऊस

सातारा : कोयना धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळत असून कोयना धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. कोयनेतील पाणीसाठा ८७.८२ टीएमसी झाला असून कोयना धरणाच्या सहा दरवाजांतून ५२ हजार १७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.कोयना धरणामध्ये शनिवारी सकाळपर्यंत ३९ हजार ६५४ क्युसेक इतक्या पाण्याची आवक झाली. धरणातील पाण्याची आवक वाढल्याने प्रशासनाने पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. कोयना धरण परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी ५ ते शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७० मिलिमीटर, नवजात ११० मिलिमीटर, महाबळेश्वरमध्ये ८७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरापासून शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी एकूण ११.६ मि.मी. पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी ४३९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिली मीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- ८.१, जावळी- १३.४, पाटण-३८.१, कराड-१३.६, कोरेगाव-२.६, खटाव-१.८, माण- १.२., फलटण- ०.३, खंडाळा- ०.१, वाई-४.७, महाबळेश्वर- ६३ इतक्या पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात प्रमुख धरणांतून विसर्ग सुरुचउरमोडी धरणातून ८४१ क्युसेक, कण्हेरमधून १४०६ क्युसेक, धोममधून ७४६ क्युसेक, बलकवडीतून २८० क्युसेक, वांग मराठवाडीमधून १,७२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग शनिवारी सकाळी ८ पासून सुरु होता.धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)कोयना : ८७.८२उरमोडी : ७.४०कण्हेर : ७.६३धोम : १०.२०बलकवडी : ३.३७वांग मराठवाडी : १.९२९मोरणा गुरेघर : ०.९५९

टॅग्स :Koyana Damकोयना धरणRainपाऊसSatara areaसातारा परिसर