आदर्की : फलटण तालुक्यातील आळजापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिलीप महिपत नलवडे यांची, तर उपसरपंचपदी राजकुंवर तुकाराम नलवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शुभम नलवडे, सचिन मसुगडे, सुनील पवार, छाया जालिंदर नलवडे, पुष्पा चंद्रकांत पवार, गीतांजली मनोज नलवडे, उज्ज्वला पांडुरंग भंडलकर उपस्थित होते.
सरपंच दिलीप नलवडे व उपसरपंच राजकुंवर यांचे विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, विजय ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन विश्वासराव धुमाळ, राष्ट्रवादी पक्षाचे माजी फलटण तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, आळजापूरचे पोलीस पाटील शंकरराव नलवडे, दूध संघाचे संचालक तुकाराम नलवडे, माजी सरपंच मधुकर काकडे, मोहन नलवडे, चंदर पवार, अशोक पवार, रघुनाथ नलवडे, जयवंत केंजळे राजेंद्र नलवडे, मारुती रणदिवे आदींसह ग्रामस्थांनी कौतुक केले.