शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

धोम धरणाच्या गाळात दडलाय काळ !

By admin | Updated: March 16, 2016 23:38 IST

डोहात उडी, मृत्यूशी गाठ : तहान भागविणाऱ्या जलाशयानं घेतले अनेकांचे जीव; सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा

वाई : दूरवर पसरलेला जलाशय अन् मनाला मोहिनी घालणारं निसर्गसौदर्य असं हे हिरव्या कोंदणात असलेलं ठिकाण म्हणजे वाई तालुक्यातील धोम धरण. पाचगणी, महाबळेश्वरला फिरायला आलेल्या पर्यटकांना धोम धरणाचा डोह जणू भुरळ पाडतो. म्हणूनच धोमच्या डोहात डुंबण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. पण हाय... डोळ्यांना सुखावणारा आणि कोरडे घसे ओलावणारा हा जलाशय गाळाचं प्रमाण वाढल्यानं चक्क माणसांच्याच जिवावर उठलाय. धरणे ही राष्ट्रीय सपत्ती मानली जाते. सातारा जिल्ह्यात कोयना धरणानंतर वाई तालुक्यातील धोम धरण महत्त्वाचे मानले जाते. या धरणामुळे वीज, शेती सिंचन, पिण्याचे पाणी हे प्रश्न सोडविण्यात मदत झाली आहे. या धरणामुळे अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. गेल्या चार दशकांपासून माणसासह पशु-पक्ष्यांची तहान भागविणाऱ्या धोम धरणाकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. असुरक्षितता वाढली आहे. प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे गरजेचे बनले आहे.महाबळेश्वरमध्ये उगम पावणाऱ्या कृष्णा नदीवर धोम येथे १३.५० टीएमसी क्षमतेच्या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. ३८२.३२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असलेल्या धरणाचे पाणलोट क्षेत्र २१७.५६ चौरस किलोमीटर आहे. तर बुडित क्षेत्र २४०० हेक्टर इतके आहे. धरणनिर्मितीत ४२ गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या धरणामुळे राज्यातील हजारो एकर जमीन पाण्याखाली आली आहे. दुष्काळी खंडाळा, फलटण तालुक्यातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची सोय होऊन अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. धोम धरणातून बोगद्याने खंडाळा तालुक्यात कालव्याने पाणी नेले आहे व यासाठी धोम बलकवडी या दुसऱ्या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. पाचगणी, महाबळेश्वरला फिरण्यासाठी येणारे पर्यटक धोम धरण परिसरातील येथील निसर्गसौंदर्यामुळे आवर्जून भेटी देतात. या भागात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. चित्रसृष्टीलाही या परिसराने जणू वेड लावले आहे. परंतु वर्षानुवर्षे पावसाळ्यात डोंगराउतारावरील माती धरणाच्या पाण्यात वाहत जाऊन धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पर्यटक पोहोण्यासाठी पाण्यात उतरतात पण अंदाज न आल्यामुळे गाळात अडकतात. या गाळामुळे आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (प्रतिनिधी)प्रवासी लाँचला झुडपांचा विळखाधरणाच्या जलाशयात फिरण्यासाठी प्रवासी लाँचची सोय करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून ही लाँच धरणाच्या संरक्षक भिंतीजवळ पडून आहे. झाडाझुडपांच्या विळख्यात ही बोट अडकलेली पाहायला मिळते. मोडकळीस आलेल्या या बोटीला सुरक्षित ठिकाणी ठेवावे, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.संरक्षक कठडे ढासळले, सुरक्षा चौक्या मोडकळीसधरणाच्या भिंतीवरील संरक्षक कठड्याचे बांधकाम ढासळले आहे. विजेचे दिवे नादुरुस्त झाले आहेत. वाई-जांभळी रस्त्यावरील गेटवरही कोणतीही सुरुक्षा व्यवस्था राहिलेली नाही. सुरक्षा चौक्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.पोलिस संरक्षण नाहीधरणाच्या सुरक्षेसाठी पूर्वी पोलिस बंदोबस्त असायचा. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी पाठविले जात नाहीत. पूर्वी तीन पोलिस कर्मचारी व एक अधिकारी धोम धरणावर सुरक्षिततेसाठी असायचे. सध्या येथे नऊ ते दहा कर्मचारी असून त्यात वॉचमन, वायरलेस आॅपरेटर व देखरेखीसाठी मजूर अशी कामे करतात. कामगार निवृत्तीनंतर त्यांच्या जागी नवीन नियुक्त्या झाल्या नाहीत. मद्याच्या बाटल्या अन् प्लास्टिक कचऱ्याचा खचधोम धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची व नागरिकांची मोठी संख्या आहे. काही पर्यटक धरणाच्या काठावर बसून मद्यपान करतात अन् बाटल्या तेथेच फेकून देतात. तसेच प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास, पिशव्या अशा कचऱ्याचा जागोजागी खच पडला आहे. याबाबत धरण व्यवस्थापनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.