शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Mahashivratri: सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा, चित्तथरारक गिर्यारोहणाचा अनुभव घेत हजारो भक्त नागेश्वराच्या चरणी

By सचिन काकडे | Updated: March 8, 2024 17:21 IST

'हर हर महादेव'च्या जयघोषाने भक्तांमध्ये चैतन्य संचारले

सातारा : कोयनेचे घनदाट जंगल पाहता क्षणी दरदरून घाम फोडणाऱ्या सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा, घसरड्या पाऊलवाटा अशा चित्तथरारक गिर्यारोहणाचा अनुभव घेत हजारो भक्त शुक्रवारी किल्ले वासोट्याजवळ असलेल्या नागेश्वराच्या चरणी नतमस्तक झाले. 'हर हर महादेव'च्या जयघोषाने भक्तांमध्ये चैतन्य तर संचारलेच शिवाय महाशिवरात्रीला भक्ती आणि शक्तीचा संगमही पाहायला मिळाला.सातारा जिल्ह्यात महाशिवरात्री धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावून महादेवाचे दर्शन घेतले. किल्ले वासोट्याजवळील उंच सुळक्यावर असलेले नागेश्वराचे मंदिर हजारो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. या नागेश्वराच्या दर्शनासाठी सातारा, रत्नागिरी तसेच अन्य जिल्ह्यांतील हजारो भक्तांनी शुक्रवारी हजेरी लावली. भक्तांना दर्शन घेता यावे म्हणून तापोळा, बामणोली, मुनावळे येथून बोटींची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासूनच हजारो भाविक नागेश्वराच्या दिशेने रवाना झाले. जलसफारी, जंगलसफारीचा थरारक अनुभव घेत भक्त नागेश्वराच्या पायथ्याला पोहोचले. दर्शनासाठी मंदिरापासून दूर अंतरापर्यंत भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. हजारोंच्या संख्येने आलेल्या भक्तांनी नागेश्‍वराचे दर्शन घेत परतीचा प्रवास पार पाडला. वनविभागाकडून भक्तांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahashivratriमहाशिवरात्री