शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

Satara: देऊर रेल्वे गेट दोन दिवस राहणार बंद; वाहतूक व्यवस्थेत केले बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 13:06 IST

पिंपोडे बुद्रुक: पुणे मिरज रेल्वे मार्गावर   रेल्वे रूळ दुरूस्ती व निरीक्षणासाठी देऊर तालुका कोरेगाव येथील सातारा लोणंद पुणे ...

पिंपोडे बुद्रुक: पुणे मिरज रेल्वे मार्गावर  रेल्वे रूळ दुरूस्ती व निरीक्षणासाठी देऊर तालुका कोरेगाव येथील सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट आज, बुधवार (दि. ३१) व गुरूवार दि. १ ऑगस्टच्या रात्री आठ वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काढली.मध्य रेल्वेच्या वाठार स्टेशन येथील उपमुख्य विभागीय अभियंता यांनी देऊर रेल्वे गेटच्या ठिकाणी रेल्वे रूळ दुरूस्ती व निरीक्षणासाठी सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्ग दोन दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव पुणे येथील उपमुख्य स्थापत्य अभियंता यांना सादर केला होता. त्यांनी दिलेल्या पत्रानुसार वाहतूक बंद ठेवण्याचा प्रस्ताव सातारा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला होता. लोणंद येथून खंडाळा अथवा शिरवळ मार्गे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याकडे येता येणार आहे. वाढे फाटा ते लोणंद अशी अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून ती शिरवळ मार्गे लोणंदकडे वळविण्यात आली आहे. फलटण आणि लोणंद येथून साताऱ्याकडे येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने आणि दुचाकी वाहने आदर्की फाटा येथील फौजी ढाबा, तडवळे संमत वाघोली, पिंपोडे बुद्रुक, वाघोली, अंबवडे संमत वाघोली मार्गे साताऱ्याकडे वळविण्यात आली आहेत.सातारा व कोरेगाव कडून येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने आणि दुचाकी वाहने अंबवडे संमत वाघोली, वाघोली, पिंपोडे बुद्रुक, तडवळे संमत वाघोली मार्गे लोणंद अथवा आदर्की फाटा फौजी ढाबा मार्गे फलटणकडे जातील. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारांच्या एस.टी. बसेसना अंबवडे संमत वाघोली येथून वाघोली, पिंपोडे बुद्रुक ते वाठार स्टेशन या मार्गावरून जाण्यासाठी आणि येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. वळविण्यात आलेल्या मार्गावर सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले असून आवश्यक तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडी