शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फार्महाऊसवरील साहित्य चोरणारी टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 16:07 IST

फार्महाऊसवरील साहित्य चोरणाऱ्या टोळीकडून स्थानिक गुन्हे शाखेने ३ लाख २५ हजारांचा ऐवज जप्त केला असून, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

ठळक मुद्देफार्महाऊसवरील साहित्य चोरणारी टोळी अटकेतस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : तीन लाख २५ हजारांचा ऐवज जप्त

सातारा : फार्महाऊसवरील साहित्य चोरणाऱ्या टोळीकडून स्थानिक गुन्हे शाखेने ३ लाख २५ हजारांचा ऐवज जप्त केला असून, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.रोहित संतोष मोहिते (वय २०), विवेक उर्फ मुंगव्या विलास कांबळे (वय २२, रा. नागठाणे, ता. सातारा), ज्योतीराम उर्फ चाणक्य बबन ढाणे (वय ३४, रा. पाडळी, ता. सातारा), अमोल संभाजी मोरे (वय २२, रा. पाडळी रोड, नागठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मालवाहू टेम्पोतून चोरीचा ऐवज नागठाणे येथे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नागठाणे रविवारी सायंकाळी सापळा लावला. मालवाहू टेम्पोतून वरील चौघे साताऱ्याकडे येत होते.

यावेळी पोलिसांनी टेम्पो अडवून संबंधितांना ताब्यात घेतले. त्यांच्या टेम्पोमध्ये सेंद्रिय खतांची पोती, केमिकलच्या बादल्या, इन्व्हटर, बॅटऱ्या, गॅस शेगड्या आदी साहित्य सापडले. हे साहित्य या टोळीने पाडळी, ता. सातारा गावच्या हद्दीतील एका फार्महाऊसवरून चोरल्याची कबुली पोलिसांना दिली.

दुसरे साहित्य निनाम पाडळी येथील पोल्ट्रीवरून चोरल्याचे तपासात समोर आले आहे. या ठिकाणाहून या टोळीने तारांचे १८ बंडल चोरले होते. हे बंडलही पोलिसांनी जप्त केले आहेत. बोरगाव पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल होते. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंह साबळे, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहायक फौजदार विलास नागे, ज्योतीराम बर्गे, पोलीस नाईक मोहन नाचन, संतोष जाधव, योगेश पोळ, प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, वैभव सावंत, अनिकेत जाधव, गणेश कचरे, पंकज बेचके यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर