शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
3
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
4
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
5
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
6
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
7
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
8
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
9
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
10
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
11
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
12
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
13
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
14
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
15
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
16
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
17
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
18
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
19
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
20
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका

देसार्इंचे ‘साडू’; कदमांचे ‘पाहुणे’! उदयदादांच्या डोक्यात चाललंय काय? राजकीव वर्तुळात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:05 PM

प्रमोद सुकरे । कऱ्हाड : गतवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कऱ्हाडातील शस्त्रपूजनाला अ‍ॅड. उदयसिंह पाटलांनी हजेरी लावली. अनेकांच्या भुवया त्यामुळे ...

ठळक मुद्देही चर्चा अजूनही पूर्णपणे थांबलेली दिसत नाही.हर्षद कदमांनी तीन दिवस कोयना महोत्सवाचे आयोजन केले होते

प्रमोद सुकरे ।कऱ्हाड : गतवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कऱ्हाडातील शस्त्रपूजनाला अ‍ॅड. उदयसिंह पाटलांनी हजेरी लावली. अनेकांच्या भुवया त्यामुळे उंचावल्या. आता तर दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी मल्हारपेठ, ता. पाटण येथे आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमाला उदयसिंह पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सध्या काँगे्रस अंतर्गत संघर्षामुळे पक्षापासून सुरक्षित अंतरावर असलेल्या उदयसिंह यांच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय? याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

अ‍ॅड. उदय पाटील यांना माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या विचारांचा वारसा आहे. मात्र, गत विधानसभा निवडणुकीला काँगे्रसने विलासकाकांना उमेदवारी नाकारल्याने त्यांना बंडाचा झेंडा हाती घ्यावा लागला. त्यावेळपासून काँगे्रस पक्ष आणि उंडाळकर यांच्यात पडलेले अंतर अजूनही कमी झालेले दिसत नाही. विधानसभेनंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकाही उंडाळकर गटाने रयत आघाडीच्या माध्यमातून लढविल्या.

विलासराव पाटील-उंडाळकरांनी विधानसभा निवडणुकीत विजयाची सप्तपदी पूर्ण करीत एक इतिहास रचला; पण त्यांचे वारसदार असणाऱ्या उदयसिंह पाटलांच्या भावी वाटचालीत अनेक अडचणी दिसतात. त्यातील पहिली अडचण म्हणजे काँगे्रस पक्षापासून असणारे अंतर मानावे लागेल. पृथ्वीबाबांनी तर मी कºहाड दक्षिणमधूनच लढणार असल्याचे अनेकदा स्पष्ट केले आहे. पुतणे अ‍ॅड. आनंदराव पाटील अगोदरच राष्ट्रवादीत जाऊन बसले आहेत. अशा परिस्थितीत उंडाळकर पिता-पुत्र काही नव्या खेळी खेळतील का? काही नवी चाचपणी करतील का? याकडे साºयांचे लक्ष आहे. त्यामुळेच ते संघाच्या कार्यक्रमाला गेल्यावर जशा उलट-सुलट चर्चा झाल्या. त्याच पद्धतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी लावलेली हजेरी चर्चेची ठरली आहे.बाळासाहेबांच्या मांडीला मांडीकाँगे्रसला कºहाड पंचायत समितीत सत्तेपासून दूर ठेवायचे, अशी खूणगाठ बांधलेल्या उदयसिंह पाटलांनी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मांडीला मांडी लावली. आता तर विधानसभेच्या तोंडावर सभापतिपदही आपल्या गटाच्या पारड्यात त्यांनी पाडून घेतलंय. चार दिवसांपूर्वी कºहाडात एका वाढदिवाच्या कार्यक्रमात बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील एकत्रित होते.पृथ्वीबाबांच्या बरोबरही हजेरीकाही महिन्यांपूर्वी एका इफ्तार पार्टीलाही पृथ्वीबाबा, आनंदराव नाना अन् उदयसिंह पाटील एकत्रित दिसले होते. त्याबरोबर तालुक्यातील एका विकाससेवा सोसायटीने आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनही पृथ्वीबाबा अन् उदयसिंह पाटलांनी एकत्रित केले होते. त्यावेळपासून सुरू झालेली चव्हाण आणि उंडाळकर गट एकत्रित येणार, ही चर्चा अजूनही पूर्णपणे थांबलेली दिसत नाही...अन् टाळ्यांचा कडकडाट झालाहर्षद कदमांनी तीन दिवस कोयना महोत्सवाचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनाला उदयसिंह पाटील यांना खास निमंत्रण दिले होते. मग उदयसिंह पाटीलही कोयनेचे पेढे घेऊन कार्यक्रमाला हजर झाले. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर स्वागत करताना कदमांनी पाटलांच्या खांद्यावर भगवी शाल पांघरली अन् उपस्थितांच्यातून टाळ्यांचा कडकडाट झाला.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर