शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ढगाळ हवामानाची पिकांवर गदा, उत्पन्नात होणार घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 10:50 IST

खंडाळा तालुक्यात परतीच्या आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. खरिपाची पिके आणि फळबागा पाण्याखाली गेल्या. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे अवकाळीची बाधा संपली नसतानाच आता दूषित हवामानाची बाधा शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

ठळक मुद्देढगाळ हवामानाची पिकांवर गदा, उत्पन्नात होणार घट शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरूच

दशरथ ननावरे खंडाळा : तालुक्यात परतीच्या आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. खरिपाची पिके आणि फळबागा पाण्याखाली गेल्या. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे अवकाळीची बाधा संपली नसतानाच आता दूषित हवामानाची बाधा शेतकऱ्यांवर ओढवली आहे.खंडाळा तालुक्याच्या शेतीचे आॅगस्टमधील पावसातच मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातला. यामध्ये बहुतांशी शेती पाण्याखाली गेली. शेतामध्ये पाणी घुसल्याने पिकाचेही मोठे नुकसान झाले. विशेषत: पिके कणसासह पाण्यात बुडाली, त्यामुळे मोठे नुकसान झाले.गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरणाचे सावट राहिल्याने खंडाळा तालुक्यातील विविध भागातील ऊस, भुईमूग, टोमॅटो, कांदा तसेच कडधान्याची पिके व काही फळबागा यावर याचा मोठा परिणाम होत आहे. अशा प्रकारच्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा रोग, नवीन ऊस लागवडीवर तांबेरा, भाजीपाल्याच्या पिकावर अळीचा व किडीचा प्रादुर्भाव तसेच वेलीवर्गातील पिकांवर मुरकुटा रोग पसरण्याची भीती वाढली आहे.खंडाळा तालुकाच्या एकूण क्षेत्रापैकी खरीप हंगामात ९ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रात पिकांची लागवड झाली होती. यापैकी तालुक्याच्या ६७ गावांमधील १३ हजार ११८ शेतकऱ्यांचे ४ हजार ४२४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे समोर आले. नुकसानीतून बाहेर पडण्यापूर्वीच दूषित हवामानाने घेरल्याने शेतकरी संकटात आहे. 

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. संपूर्ण पिकांचे नुकसान झाले असतानाच आता ढगाळ हवामानाच्या कोंडीत शेतकरी सापडलाय. आमच्या नवीन ऊस लागवडीवर तांबेरा आणि करपा रोग पसरण्याची भीती आहे. अगोदरच शेतकरी उघड्यावर आला असताना हे पुन्हा संकट म्हणजे दुष्काळात तेरावा अशी स्थिती आहे.- अ‍ॅड. सचिन धायगुडे,शेतकरी बोरी

ढगाळ वातावरणाने कांदा पिकाची पात मुरकटली आहे. तसेच काही ठिकाणी करपा रोगाची लागण होऊ लागलीय. सुरुवातीच्या वाढीलाच प्रादुर्भाव झाल्याने पिकांची उत्पादन क्षमता घटते. शेतीवर एकामागे एक संकट राहिल्यास शेतकरी उद्ध्वस्त होईल.- नवनाथ ससाणे, शेतकरी अंदोरी

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर