शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर गुन्हे नावावर असलेला प्रमोद सकट जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 19:30 IST

प्रमोद सकट याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सातारा :  शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकामागोमाग एक गुन्हे करणाऱ्या प्रमोद उर्फ बाळा काशिनाथ सकट (वय २६, रा.प्रतापसिंहनगर, सातारा) याला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार केले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रमोद सकट याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तोजामिनावर बाहेर असून त्याच्याकडून गुन्हेगारी कृत्य सुरूच असल्याने पोलिसांनी त्याला अनेकदा सुधारण्याची संधी दिली होती. मात्र, त्याच्या वागण्यात काही फरक पडत नसल्याने व समाजात त्याच्यामुळे अशांतता पसरत असल्याने सातारा शहर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला होता.त्यावर झालेल्या सुनावणीनंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी त्याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तडीपारी काळात संशयित सातारा जिल्ह्यात फिरताना दिसल्यास लोकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला कळवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहायक  पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, हवालदार सुजित भोसले, गणेश ताटे, राजुकांबळे, अविनाश चव्हाण, जोतीराम पवार आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी