कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्यावर नवीन उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी केली जात आहे. पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गालगत कोल्हापूर नाका येथे वारंवार अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर नाक्यावर कोल्हापूर ते सातारा जाणाऱ्या लेनवर उड्डाणपूल होण्याची गरज आहे.
पायी प्रवास (फोटो : ०५इन्फोबॉक्स०२)
पाटण : पाटण तालुक्यातील काही ग्रामीण भागात आजही रस्त्याच्या सुविधा नसल्यामुळे तेथील शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. या तालुक्यातील काही गावे डोंगर, जंगल क्षेत्रात असल्यामुळे तेथे दळणवळण तसेच सुविधांची कमतरता आहे. या ठिकाणी शासनाकडून आवश्यक सुविधा पुरविणे गरजेचे आहे.
फुटपाथची दुरवस्था
कऱ्हाड : शहरातील दत्तचौक ते कृष्णा नाका या मार्गादरम्यान रस्त्याकडेला असणाऱ्या पादचारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या पादचारी मार्गावर ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या फरशा फुटल्या आहेत. त्यामुळे खड्डे निर्माण झाले असून पादचाऱ्यांना यावरून प्रवास करताना धोका निर्माण होत आहे. पादचारी मार्गाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
बसथांबे उद्ध्वस्त
मल्हारपेठ : कऱ्हाड-नवारस्ता दरम्यान मार्गावर एकही झाड शिल्लक राहिलेले नाही. उभे असणारे बसथांबेही भुईसपाट झाले आहेत. कऱ्हाड-पाटण या ३४ किलोमीटर अंतरातील अनेक थांबे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. या मार्गावर बसथांबे उभारण्याची मागणी होत आहे.