शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

व्हिडीओ पार्लर सुरू ठेवण्यासाठी मागितली खंडणी; हॉटेल मालकाला मारहाण-सहाजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 7:15 PM

मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सुरज संजय मुळीक (रा. धामनेर, ता. कोरेगाव) हे अंजठा चौकातील व्हिडीओ गेम पार्लरमध्ये काम करत होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या शेडगे याने तू आमच्या परिसरात हे दुकान चालवतोस, तुला दुकान चालू ठेवायचे असेल तर मला

ठळक मुद्दे एकावर गुन्हा : पोलिसांकडून तपास सुरूलोखंडी रॉडने कदम यांच्या मित्राच्या कपाळावर मारून निघून गेले. यावेळी संशयितांनी हॉटेलमधील खुर्च्यांची तोडफोड केल्याचेही तक्रारीत आहे. सीसीटीव्हीमुळे लागला चोरीचा छडा; युवकाला अटक

सातारा: व्हिडीओ गेम पार्लर चालवणाऱ्याला मारहाण करत पाच हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना अजंठा चौकात मंगळवारी रात्री घडली.सोपान उर्फ काका बाबुराव शेंडगे (रा. धनगरवाडी, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सुरज संजय मुळीक (रा. धामनेर, ता. कोरेगाव) हे अंजठा चौकातील व्हिडीओ गेम पार्लरमध्ये काम करत होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या शेडगे याने तू आमच्या परिसरात हे दुकान चालवतोस, तुला दुकान चालू ठेवायचे असेल तर मला पाच हजार रुपये खंडणी द्यावे लागतील, असे सांगितले. त्यास तक्रारदाराने नकार दिल्यामुळे चिडलेल्या संशयिताने त्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जाताना व्हिडीओ गेम चालवण्यासाठी असलेली मशिन जबरदस्तीने नेली. संशयिताने यापूर्वीही वेळोवेळी खंडणी म्हणून एक लाख रुपये उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील हे करत आहेत.

 

  • बिल मागितल्यामुळे हॉटेल मालकाला मारहाण

सहाजणांवर गुन्हा : खुर्च्यांचीही तोडफोडसातारा:   जेवण झाल्यानंतर बिल मागितल्याने हॉटेल मालकाला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना वळसे, ता. सातारा गावच्या हद्दीतील हॉटेल राजधानी येथे मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी गणेश दिलीप घाडगे, रणजीत सूर्यवंशी, सुरल सूर्यवंशी, अमोल घाडगे, सुरज घाडगे (सर्व रा. कामेरी, ता. सातारा) महेश घोरपडे (रा. नांदगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सनी अशोक कदम (रा. शेंद्रे, ता. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  वळसे गावच्या हद्दीतील हॉटेल राजधानी येथे मंगळवार दि. १ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वरील संशयित जेवणासाठी गेले  होते. जेवण झाल्यानंतर बिल घेण्यासाठी हॉटेलचे मालक  सनी कदम हे गेले असता बिल मागितल्याच्या कारणावरून चिडून जाऊन संबंधितांनी शिवीगाळ करत हाताने लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने कदम यांच्या मित्राच्या कपाळावर मारून निघून गेले. यावेळी संशयितांनी हॉटेलमधील खुर्च्यांची तोडफोड केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

  •  सीसीटीव्हीमुळे लागला चोरीचा छडा; युवकाला अटक

सातारा : आरतीच्या वेळी गर्दीचा फायदा घेऊन महिलेची पर्स चोरणाºया चोरट्याचा छडा सीसीटीव्हीमुळे लावण्यास पोलिसांना यश आले. चोरट्याकडून चोरीचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे.अरूण गोरख पिटेकर (वय ३५, रा. नामदेववाडी, ता. सातारा) असे अटक  झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नवरात्रोउत्सवामुळे सध्या मोती चौकात सायंकाळच्या सुमारास आरतीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन बुधवारी सायंकाळी एका महिलेची पर्स व त्यातील पाच हजार आणि दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. या प्रकारानंतर सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक भोसले व त्यांच्या टीमने मोती चौकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यामध्ये एक युवक  कैद झाला होता. वर्णनावरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता अरूण पिटेकरचे नाव पुढे आले. पिटेकर हा राजवाडा येथून जात असताना होमगार्ड व पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने चोरीची कबुली दिली असून, चोरीचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस