मसूर : मसूर ते शामगाव घाट दरम्यानच्या रस्त्यावर असणाऱ्या आरफळ कालव्यावरील पुलाचे कठडे बांधण्याची मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.
मसूर ते शामगाव घाटादरम्यान असणाऱ्या रस्त्यावर आरफळ कालव्याचा पूल आहे. या पुलावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे बांधण्यात आले होते. परंतु, त्या कठड्यांमध्ये असणाऱ्या सळीच्या कारणाने कठडे फोडून सळ्या चोरीला गेल्या आहेत. याचा परिणाम म्हणून संरक्षक कठडेच गायब झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने या रस्त्यावर असणाऱ्या पुलाची पाहणी करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुलावर संरक्षक कठडे बांधावेत, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
फोटो ०३ मसूर
मसूर ते शामगाव रस्त्यावर माळवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या आरफळ कॅनॉलच्या पुलाचे कठडे तुटलेले आहेत. (छाया : जगन्नाथ कुंभार).