नागठाणे : खोटा दस्त तयार करून तो मंजूर करून जमीन हस्तगत केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात यावी, याबाबतची फिर्याद प्रमोद साहेबराव बनकर यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
बोरगाव पोलीस आणि फिर्यादीकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येथील गट नं. १३१ मधील वडिलोपार्जित जमिनीतील २० गुंठे क्षेत्र पुतण्या चेतन रवींद्र बनकर याने शेंद्रे भागातील मंडलाधिकारी यांच्याकडून खोटा खरेदी दस्त करून बावीस लाख रुपये देऊन खरेदी केले असल्याचे भासविले आहे. याबाबत या क्षेत्राबद्दल प्रांताधिकारी यांच्यामार्फत कोर्टात खटला सुरू आहे. असे असूनही पुतण्या चेतन बनकर याने मंडलाधिकारी यांना जोडीस धरून त्यांच्याकडून बनावट खरेदी दस्त करून खरेदी केल्याचे भासविले आहे. याची बनावट नोंद करून मंडलाधिकारी यांनी संबंधित व्यक्तीस मदत केली असल्यामुळे याबाबत पुतण्या चेतन बनकर आणि शेंद्रे भागातील मंडलाधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी फिर्याद चुलते प्रमोद बनकर यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.