शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माढ्यात आघाडी धर्म पाळला नसल्यानेच पराभव; विधानसभा निवडणुकीत वेगळी भुमिका

By दीपक देशमुख | Updated: June 17, 2024 20:54 IST

साताऱ्यातील बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांचा पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लोकसभेला माढ्यात भाजप उमेदवाराचा पराभव हा फलटण, करमाळा, सांगोला माढा आदी मतदारसंघात राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळला न गेल्यामुळेच झाला आहे. यामुळे आगामी विधानसभेला आम्ही महायुतीचे काम करणार नाही, असा पवित्रा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.

सातारा येथे जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पश्चिम संघटन महामंत्री मकरंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माजी आमदार मदन भोसले, मनोज घोरपडे, बजरंग गावडे, अमोल असते, शहराध्यक्ष अनुप शहा, विश्वासराव भोसले, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, संजय गायकवाड, संदीप चोरमले, सोपानराव जाधव उपस्थित होते.

यावेळी जयकुमार शिंदे म्हणाले, माढ्यात राष्ट्रवादीने खासदार रणजितसिह नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात काम केल्यामुळेच त्यांचा पराभव झाला. भाजपने मोहिते-पाटील यांना आमदार केलं, त्यांच्या बंद कारखान्याला मदत केली. परंतु, त्यांनी मात्र घराला प्राधान्य दिले व पक्षहित महत्त्वाचे मानले नाही. त्यांनी उघडपणे भाजपच्या विरोधात प्रचार केला. त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यावर पक्षशिस्तीची कारवाई होऊन आमदारकी रद्द करावी. अन्यथा सर्वसामान्य भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल.

तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट, माढा मतदारसंघातील महायुतीचे घटक पक्षातील राष्ट्रवादीने संपूर्ण मतदारसंघांमध्ये विरोधात काम केले आहे. करमाळा, माढा, सांगोलाचे या मतदार संघांमधील नेते आमदार बबन शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे यांनी उघडपणे तडजोडी केलेल्या आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघांमध्ये तुतारीला लीड मिळाले आहे.

फलटण तालुक्यातही आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर व त्यांचे कुटुंबीय व सर्व पदाधिकारी यांनी उघडपणे सभा घेऊन महायुतीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने दखल घेऊन शिस्तभंगाची कारवाई करावी. त्यांच्या कार्यकर्त्यांची महामंडळावर तसेच शासकीय समित्यांवर वर्णी लावू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी अनुप शहा, सोपानराव जाधव, विश्वासराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी प्रिया शिंदे, विठ्ठल बलशेठवार, संतोष कणसे, सागर शिवदास, रणजीत जाधव, विशाल नलवडे व जिल्हातील भाजप पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :madha-pcमाढाBJPभाजपा