शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बंद महामंडळाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत जाणार : दीपक पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 16:20 IST

बंद पडलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मी घड्याळाच्याच चिन्हावर लढविणार आहे. या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे हटाव, सातारा-जावळी बचाव असाच नारा देऊन घराणेशाही संपविणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी दिली.

ठळक मुद्देबंद महामंडळाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत जाणार : दीपक पवारशिवेंद्रसिंहराजेंची घराणेशाही हटविणार; साताऱ्यात भाजपला मोठा धक्का

सातारा : बंद पडलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मी घड्याळाच्याच चिन्हावर लढविणार आहे. या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे हटाव, सातारा-जावळी बचाव असाच नारा देऊन घराणेशाही संपविणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी दिली.साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी ही माहिती दिली. यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दीपक पवार पुढे म्हणाले,२०१४ च्या निवडणुकीत भाजपला सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार मिळत नव्हता. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी केल्यानंतर मला निवडणूक लढविण्यास सांगितले. शेवटच्या दिवशी भाजपची उमेदवारी मिळाली. प्रचारासाठी अवघे १२ दिवस शिल्लक असल्याने मतदारसंघात फारसे फिरत आले नाही. तरीही विरोधी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात चांगली मते घेतली.

या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्याचा पुढील आमदार आपल्याला भाजपचा करायचा म्हणून सांगितलं. त्यासाठी मतदारसंघात पाच वर्षे फिरतोय. प्रत्येक घरात पक्ष नेला. सातारा नगरपालिकेत प्रथमच भाजपचं पॅनेल टाकलं. तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी जावळीतून मताधिक्य दिलं. त्यानंतर जावळी आपल्या मागे नाही, हे ओळखूनच शिवेंद्रसिंहराजे भाजपात आले.भाजपच्या वरिष्ठांनी शिवेंद्रसिंहराजेंना पक्षात घेतले आणि साताऱ्याच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली. यावरून आमचे कार्यकर्ते म्हणाले, सातारा-जावळी विधानसभेची निवडणूक लढवायची. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

दि. २२ सप्टेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सातारा दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी पक्षप्रवेश करणार आहे. सातारा विधानसभेची निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढविणार असून, शिवेंद्रसिंहराजे हटाव, सातारा-जावळी बचाव नारा देत त्यांची घराणेशाही संपविणार आहे. या निवडणुकीत माझ्याबरोबर भाजपचे अनेक बुथप्रमुख आणि पदाधिकारी असणार आहेत, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.वसुलीच्या महामंडळाकडे एक रुपयाचाही फंड नाही...पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ हे बंद पडलेलं आहे. त्याचं गॅझेटही झालेलं नाही. मी महामंडळ घेत नसतानाही ते मला दिलं. हे एक प्रकारचं गाजर दाखविण्याचं काम झालं असून, महामंडळाकडे एक रुपयाचा फंडही नाही. उलट ७०० कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे एकप्रकारे हे वसुलीचंच महामंडळ आहे का काय ? असा प्रश्न पडतो. भाजपने माझी प्रतारणा केली असलीतरी मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविषयी माझ्या मनात रोष नाही. फक्त शिवेंद्रसिंहराजेंना हटविण्यासाठीच हा निर्णय घेतलाय, असेही दीपक पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेSatara areaसातारा परिसरBJPभाजपाPoliticsराजकारण