शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वहागावात शालेय साहित्यांची मोडतोड, अज्ञातांचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 16:19 IST

कऱ्हाड  : वहागाव, ता. कऱ्हाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी आयएसओ करण्यासाठी लोकसहभागातून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही ...

ठळक मुद्देवहागावात शालेय साहित्यांची मोडतोड, अज्ञातांचे कृत्यदोन वर्षांत सहा ते सातवेळा प्रकार; ग्रामस्थांत संताप

कऱ्हाड  : वहागाव, ता. कऱ्हाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी आयएसओ करण्यासाठी लोकसहभागातून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही समाजकंटक हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी व वैयक्तिक द्वेषापोटी शालेय साहित्यांची मोडतोड करून त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजकंटकांच्या या वर्तनाविषयी ग्रामस्थांत संतापाचे वातावरण आहे.वहागाव प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगल्या पद्धतीने उंचावत चालला आहे. परिसरातील तेरा शाळांची केंद्र शाळा असलेल्या या शाळेत विद्यार्थी संख्याही चांगली आहे. येथील शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे शाळेचा दर्जा चांगल्या पद्धतीने सुधारत आहे.

शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेली धडपड पाहून गावातील युवक, ग्रामस्थांनी शाळा आयएसओ करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी आपापल्या पद्धतीने मदतीचा हात देण्यासाठी सुरुवात केली आहे. ग्रामस्थांच्या लोकसहभागातून शाळेचे रुपडे पालटत चालले आहे.भावी पिढीचा सर्वांगीण विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वखर्चातून शाळेच्या रंगरंगोटीसह, पिण्याच्या पाण्याची टाकी आणि अन्य योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी कौतुकाची थाप दिली. एकूणच आयएसओच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांसह, शिक्षिकांना त्याचा फायदा होत असल्याने दिवसेंदिवस शाळेचे रुपडे पालटत चालले होते.

शाळेची प्रगती होत असल्याने ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण होते. मात्र, काही समाजकंटकांकडून शाळेच्या साहित्याची मोडतोड करून त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीही संगणकासह, दरवाजे व इतर शालेय साहित्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न झाला आहे. गेल्या दोन वर्षांत सहा ते सातवेळा येथील साहित्य मोडतोडीचा प्रकार झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यात संताप व्यक्त होत आहे. संबंधित अपप्रवृत्तींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरzp schoolजिल्हा परिषद शाळा