शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मृतदेहाची लोणंद कचरा गाडीतून फरपट-माणुसकीला काळिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:38 IST

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह गेल्या तीन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कचऱ्यात फेकून देण्यात आला. दरम्यान, दुर्गंधी सुटल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तक्रार केली.

ठळक मुद्देलोणंदमधील घटनेने नागरिकांमध्ये संताप

लोणंद : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह गेल्या तीन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कचऱ्यात फेकून देण्यात आला. दरम्यान, दुर्गंधी सुटल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तक्रार केली. तेव्हा चक्क कचरा गाडीतून या बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. माणुसकीला काळिमा फासणाºया लोणंदमधील या धक्कादायक प्रकाराचा सर्व स्तरातून जोरदार निषेध होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एका अनोखळी इसमाचा लोणंदनजीक अपघातात मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बेवारस मृतदेहाला लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन विभागात ठेवण्यात आले. शासकीय नियमानुसार एखादा मृतदेह चौकशीसाठी ७२ तास शवविच्छेदन गृहात ठेवला जातो. यानंतर पोलिसांकडून अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, तीन दिवसांपूर्वीमृत्यू होऊनही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. मृतदेह पूर्णपणे सडल्याने त्याची परिसरातदुर्गंधी पसरली होती. दुर्गंधीमुळे आरोग्य केंद्राच्या आवारात उभे राहणेही मुश्कील बनले होते.याबाबत परिसरात राहणाºया नागरिकांनी तातडीने याची माहिती वैद्यकीय अधिकाºयांना दिली. त्यानी केलेल्या तपासणीनंतर ही दुर्गंधी मृतदेहाची असल्याची बाबसमोर आली.

यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची धावपळ सुरू झाली. लोणंद नगरपंचायतीची कचरागाडी आरोग्य केंद्रात बोलविण्यात आली. या गाडीतूनच बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, माणुसकीला काळिमा फासणाºया या घटनेमुळे ेलोणंदमधील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

लोणंद नगरपंचायतीच्या याच कचरागाडीतून बेवारस मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात शीतगृह नसल्याने अनेकवेळा या भागात मृतदेहाची दुर्गंधी पसरते. सोशल मीडियावर प्रसारित बातमी चुकीची असून, या मृतदेहाचे शवविच्छेदन करून ७२ तास पूर्ण झाल्यानंतरच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.- डॉ. व्ही. ए. गोखले,वैद्यकीय अधिकारीबेवारस मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी आरोग्य विभागाच्या गाडीचा उपयोग केला गेला. त्यावेळी गाडीमध्ये कचरा नव्हता. या मृतदेहाबरोबर नगर पंचायतीचे कर्मचारीही होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे या बेवारस मृतदेहाची हेळसांडझाली नाही.- शंकर शेळके, नगरपंचायत, आॅफिस सुप्रिडेंट 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यू