शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

दिन दिन दिवाळी... खरेदीची झळाळी!

By admin | Updated: November 11, 2015 23:48 IST

नव्याची नवलाई : नव्या वस्तूंनी घरे सजली; पाडवा, भाऊबीजेसाठी भेटवस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी

सातारा : दिवाळी सणामुळे सध्या घराघरांत उत्साहाचे वातावरण आहे. मुले, स्त्रिया यांचा तर हा लाडका सण. दीपावली म्हणजे नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूंच्या खरेदीची ही पर्वणीच असते. दिवाळी-दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकजण घरात नवीन वस्तू खरेदी करून आणतात. यामध्ये घरापासून ते कपडे, टीव्ही, आटाचक्की, ओव्हन अशा वस्तूंची खरेदी केली जाते.सर्वकाही मिळते घरबसल्यासुईपासून दागिन्यापर्यंत अन् मोबाईलपासून गाड्यांपर्यंत सर्वकाही आॅनलाईनवर खरेदी करता येऊ शकते, तेही कंपनीच्या मूळ किंमतीत. खरेदीचा हा फंडा आता ग्रामीण भागातही पोहोचला असून विविध कंपन्यांच्या गाड्या माल घेऊन ग्राहकांच्या दारात पोहोचत आहेत. ही खरेदी घरबसल्या मोबाईलवरूनही करता येते. आपल्याला हवी असलेल्या वस्तूचे बुकिंग करायचे अन् ती वस्तू आपल्या हातात पडल्यानंतरच पैसे द्यायचे, अशी सोय असल्यामुळे ही पद्धत आता खेडोपाड्यातही रूजू पहात आहे.सण, उत्सवात आॅनलाईन शॉपिंगचा धडकासातारा : दुकानातील दरापेक्षा कितीतरी पटीने स्वस्त वस्तूंची खरेदी घरबसल्या करता येत असल्याचे सत्य उमगल्यामुळे अनेक जण सण, उत्सवांमध्ये आॅनलाईन शॉपिंग करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.एखाद्या कंपनीने तयार केलेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत तिची किंमत कैक पटीने वाढलेली असते. मात्र, आॅनलार्ईन शॉपिंगमुळे वस्तू कंपनीच्या किमतीत मिळते. सध्या दीपावलीचा सण असल्यामुळे विविध कंपन्यांनी सवलती दिल्या आहेत. मुळातच स्वस्त आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळत असल्यामुळे आॅनलाईन विश्वासार्हता वाढत आहे. त्यातच सण, उत्सवानिमित्त विविध भेटवस्तू, सवलती मिळत असल्यामुळे अशा खरेदीकडे लोकांचा ओढा वाढला आहे. मोबाईल, कपडे, गाडी, संसारोपयोगी साहित्य, दागिने एवढेच नव्हे तर आपल्याला हवी ती वस्तू आॅनलाईनवर उपलब्ध होते. ग्रामीण भागातही अशा पद्धतीने खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. यामुळे पैसे वाचत असल्याचे मत ग्राहकांकडून व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)घरगुती उपकरणांना गृहिणींची पसंतीरेडिमेडच्या जमान्यातही टेलर्सची चांदी !