शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात डॉक्टर महिलेला दाऊद गँगची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 14:54 IST

साताऱ्यातील महिला डॉक्टरला अनोळखीने मोबाईलवर खंडणीसाठी धमकीचा मेसेज केल्याने खळबळ उडाली असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास डॉक्टरसह कुटुंबीयांना शूट करण्याची धमकीही देण्यात आली आहे. दरम्यान, हा मेसेज इंग्लिशमध्ये टाकण्यात आला असून, त्यामध्ये इफ यू वोंट गिव्ह ८०,००० विल शूट यू अँड यूअर फॅमिली सून. दाऊद गँग असा उल्लेख आहे.

ठळक मुद्दे साताऱ्यात डॉक्टर महिलेला दाऊद गँगची धमकी८० हजारांच्या खंडणीची मागणी: सायबर सेलला गुन्हा दाखल

सातारा: साताऱ्यातील महिला डॉक्टरला अनोळखीने मोबाईलवर खंडणीसाठी धमकीचा मेसेज केल्याने खळबळ उडाली असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास डॉक्टरसह कुटुंबीयांना शूट करण्याची धमकीही देण्यात आली आहे. दरम्यान, हा मेसेज इंग्लिशमध्ये टाकण्यात आला असून, त्यामध्ये इफ यू वोंट गिव्ह ८०,००० विल शूट यू अँड यूअर फॅमिली सून. दाऊद गँग असा उल्लेख आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील महिला डॉक्टरला दि. १२ रोजी मोबाईलवर मेसेज आला. हा मेसेज महिला डॉक्टर यांनी वाचल्यानंतर त्या घाबरल्या. याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी पोलीस मुख्यालयापाठीमागील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना मेसेजबाबत माहिती सांगून तो मेसेज दाखवला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार धमकीचा मेसेज असलेला मोबाईल क्रमांक परदेशातील असण्याची शक्यता आहे. पोलीस तपासानंतर याप्रकरणातील वस्तूस्थिती समोर येणार आहे.दरम्यान, सातारा पोलीस दलातर्फे नागरिक, व्यावसायिक यांना आवाहन करण्यात आले आहे की, जर मोबाईलद्वारे कोणालाही खंडणीचा मेसेज आला असेल तर तत्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा दैनंदिन व्यवहारामध्ये वापर करत असताना नागरिकांनी जागरुक राहावे, असे आवानही पोलिसांनी केले आहे.एका वकिलाही हाच मेसेज...दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील वकील धीरज घाडगे यांनाही असाच मेसेज आला आहे. त्यांनीही तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली आहे. खंडणीची रक्कम पाहता, हा खोडसाळपणा कुणी तरी केला असावा, अशी शक्यताही पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर