शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

'दशरथ नंदना.. बाळा जो जो रेच्या पाळणा गीतांनी रामनवमी साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 22:28 IST

दशरथ नंदना... बाळा... जो जो रे यासारख्या पारंपरिक पाळणा गीतांनी जिल्ह्यात उत्साहात रामनवमी सोहळा साजरा झाला. चाफळ येथील तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिरात गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत रामनवमी उत्सव साजरा केला.

सातारा/चाफळ : दशरथ नंदना... बाळा... जो जो रे यासारख्या पारंपरिक पाळणा गीतांनी जिल्ह्यात उत्साहात रामनवमी सोहळा साजरा झाला. चाफळ येथील तीर्थक्षेत्र श्रीराम मंदिरात गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत रामनवमी उत्सव साजरा केला. फलटण येथेही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.सातारा शहरातील विविध राममंदिरांत हा सोहळा झाला. येथील समर्थ मंदिर परिसरातील श्री दामले राममंदिरात वेदमूर्ती हरिरामशास्त्री जोशी यांनी जन्मकाळाचे वर्णन अतिशय भावपूर्ण वातावरणात सादर केले. त्यानंतर गुलाल व पुष्पांजली उधळत रामनामाचा गजर करण्यात आला. शहरातील काळाराममंदिर येथे राम यज्ञाची सांगता झाली. शहरातील प्रतापगंज पेठेतील गोराराम मंदिरात जन्मकाळानंतर पालखी सोहळा संपन्न झाला.गेंडामाळ येथील श्रीरामध्यान मंदिर, शनिवार पेठेतील शहा राममंदिर, फुटका तलावानजीकचे माटे राममंदिर, खणआळीतील राम मंदिर, व्यंकटपुरातील दिवेकर राम मंदिर, तसेच संगम माहुलीतील पंचधातूच्या सुरेख मूर्ती असणा-या श्रीराम मंदिरात जन्मोत्सव साजरा केला. प्रतापगंज पेठेतील श्रीराम मंडळानेही सायंकाळी रामरथाची मिरवणूक काढली होती.रामनामाची महती संपूर्ण जगाला पटवून देणाºया श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या गोंदवले बुद्रुक येथील थोरले श्री राम व धाकटे राममंदिरात भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सज्जनगडावर स्वत: रामदास स्वामींनी पूजन केलेल्या पंचधातूच्या राममूर्तींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.चाफळ येथील मंदिराच्या मुख्य गाभाºयात फुलांनी सजविलेला पाळणा बांधला होता. दुपारी साडेबाराच्या दरम्यान समर्थ वंशज गादीचे मानकरी भूषण स्वामींच्या हस्ते पाळण्यात प्रभू रामचंद्रांची प्रतिकृती (मूर्ती) ठेवल्यानंतर पाळणा गीत व ललिताचे कीर्तनासह राम नामाच्या जयघोषात श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी श्रीरामाच्या पाळण्यावर पृष्पवृष्टी करत गुलाल खोबºयाची उधळण केली.रथाचे मानकरी दिलीप गंगाराम साळुंखे यांनी पाळण्याची दोरी सोडल्यानंतर पाळणा खाली घेऊन त्यातील मूर्ती समर्थ वंशजांच्या ओटीत घालण्यात आली. यानंतर उपस्थितांना सुंठवडा वाटप केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर