गटारीमुळे दुर्गंधी
कऱ्हाड : शहरातील मंडई परिसरात असलेली गटारे सातत्याने तुंबलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. भाजीपाला विक्रेते शिल्लक राहिलेला भाजीपाला, तसेच कचरा गटारांमध्ये टाकत असल्याने तो कुजून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी, तेथील रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत पालिकेने योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.
नागरिकांची गैरसोय
कऱ्हाड : सैदापूर, कृष्णा कॅनॉल चौक परिसरात नागरिकांची स्वच्छतागृहांअभावी गैरसोय होत आहे. कृष्णा कॅनॉल परिसरात व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांची वर्दळ जास्त प्रमाणात असते. स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून याठिकाणी ग्रामपंचायतीने स्वच्छतागृहांची सोय करावी, अशी मागणी नागरिक, विद्यार्थ्यांकडून होत आहे.
पथदिव्यांची गरज (फोटो : ३१इन्फो०२)
मलकापूर : मलकापूर भाजी मंडई ते कृष्णा रुग्णालय परिसरात उपमार्गावर महिलांची नेहमीच वर्दळ असते़ या परिसरात पथदिव्यांची कोणतीही सोय नसल्याने अनेकवेळा अनुचित प्रकार घडतात़ हा परिसर रात्रीच्यावेळी निर्मन्युष्य असतो. तसेच येथे उड्डाणपूल असल्याने अंधाराचे साम्राज्य असते. अनुचित घटना रोखण्यासाठी येथे पथदिव्यांची सोय करणे गरजेचे आहे़