शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पार्ले दरम्यानचा ओढ्यावरील पुल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 19:03 IST

पार्ले ता कऱ्हाड येथील बनवडी आणि पार्ले दरम्यानचा ओढ्यावरील पुल धोकादायक बनला आहे. पुलाचे खालच्या बाजूने सिमेंट काँंक्रीट निघून गेले आहे तर स्टिल उघडे पडले आहे. त्यामुळे पुल कमकुवत बनला आहे.

ठळक मुद्दे पार्ले दरम्यानचा ओढ्यावरील पुल धोकादायक स्ट्रक्चरल आँडिट करून योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे

कोपर्डे हवेली : पार्ले ता कऱ्हाड येथील बनवडी आणि पार्ले दरम्यानचा ओढ्यावरील पुल धोकादायक बनला आहे. पुलाचे खालच्या बाजूने सिमेंट काँंक्रीट निघून गेले आहे तर स्टिल उघडे पडले आहे. त्यामुळे पुल कमकुवत बनला आहे.पार्ले येथील पूल बांधून जवळपास पन्नास वर्ष झाले असून आजच्या स्थितीला पुलाची परिस्थिती धोकादायक बनली आहे माजी आमदार व माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कै आबासाहेब पार्लेकर यांच्या प्रयत्नातून 1965 -66 च्या च्या दरम्यान हा पूल बांधण्यात आला. तेव्हापासून ज्यावेळी मोठा पाऊस झाला तेव्हा तेव्हा या पुलावरून पाणी गेले आहे . या पुलाला जवळपास पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत. अनेकदा या पुलावरून पाणी गेले असल्याने फुलाच्या अवस्था दयनीय झाली.

या पुलावरून नेहमीच लहान-मोठ्या व अवजड वाहनांची रहदारी सुरू असते ऊसाची वहातुक याच पुलावरून होते हा पूल पार्ले गावासाठी अतिशय महत्त्वाचा असून या पुलावरून पाणी गेल्यास या गावाचा संपर्क तुटतो.दरवर्षी ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी येते. ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह वेगाने असतो त्यामुळे या पुलाचे सिमेंट निघून जाऊन स्टिल उघडे पडले आहे. तसेच पुलावर मोठे खड्डेही पडले आहेत.या पुलावरून जाताना लोक घाबरत आहेत परंतु दुसरा पर्याय नसल्याने या पुलाचा वापर करावा लागत आहे.

दिवसेंदिवस हा पुल कमकुवत बनत असुन आपत्ती काळात हा पुल केंव्हाही धोका देऊ शकतो. त्यामुळे बांधकाम विभागाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन याचे स्ट्रक्चरल आँडिट करून योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर