शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सुर्लीच्या आखाड्यात होतेय ‘दंगल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:10 IST

ओगलेवाडी : ‘पैलवानांची पंढरी’ म्हणून परिसरात ओळख असलेल्या सुर्ली गावात आता मुलीही आखाड्यात सराव करू लागल्या आहेत. त्यामुळे ही तालीम वेगळी ओळख निर्माण करीत आहे. अनेक पुरुष पैलवानांना घडवणारी ही माती आता महिला खेळाडुंमुळे पुढे येणार आहे. त्यामुळे याच मातीतून नामवंत महिला मल्ल लवकरच तयार होतील, अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे.कुस्ती ...

ओगलेवाडी : ‘पैलवानांची पंढरी’ म्हणून परिसरात ओळख असलेल्या सुर्ली गावात आता मुलीही आखाड्यात सराव करू लागल्या आहेत. त्यामुळे ही तालीम वेगळी ओळख निर्माण करीत आहे. अनेक पुरुष पैलवानांना घडवणारी ही माती आता महिला खेळाडुंमुळे पुढे येणार आहे. त्यामुळे याच मातीतून नामवंत महिला मल्ल लवकरच तयार होतील, अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे.कुस्ती हा पहिल्यापासूनच पुरुषांचा खेळ म्हणून परिचित आहे. महिलांना या खेळात सहभागी होण्याची संधी फारच कमी होती. परंतु दंगलमधील गीता, बबितांचा आदर्श अनेक मुलींनी घेतला. आज अनेक मुली कुस्ती या खेळात नाव कमावण्यासाठी मेहनत करीत आहेत. शहरी भागात असणारे हे लोण आता ग्रामीण भागात पोहोचले आहे.यातून प्रेरणा घेऊन सुर्ली गावातील अंजली संतोष वेताळ, संजना बोबडे, संजीवनी मदने, श्रावणी सतीश वेताळ या मुली येथील आखाड्यातउतरत आहेत. त्या कुस्तीचा सराव करीत आहेत. सकाळी लवकर आवरून त्या घराबाहेर पडतात. तसेच तालमीत येऊन सराव करतात.या सरावाला लवकरच यश येईल आणि सुर्लीसारख्या ग्रामीण भागातून दर्जेदार महिला कुस्तीपटू तयार होतील, ही आशा निर्माण झालीआहे.मुलींनी कुस्ती क्षेत्रात नाव कमवावे, यासाठी ग्रामस्थही त्यांना पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे.मुलींचा हा सराव इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरत असून, आणखीही काही मुली कुस्तीकडे आकर्षित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठीही ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत.सराव पूर्ण झाल्यानंतर तसेच मुली कुस्तीतील सर्व डावपेच शिकल्यानंतर त्यांना स्पर्धेत उतरविले जाणार आहे. या स्पर्धांतून मुली गावाचे तसेच जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर पोहोचवतील, असा ग्रामस्थांना विश्वास आहे. कुस्ती हा खेळ फक्त पुरुषांचा नाही, हेच सध्या सुर्ली गावातील मुली दाखवून देत आहेत.