शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

वांजळे तलाव फुटल्याने ऊस, बाजरी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 16:19 IST

फलटण तालुक्यातील उपवळे, जाधवनगर, सावंतवाडा, दालवडी, दरेचीवाडी परिसरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी. यामुळे वांजळे तलाव मंगळवारी फुटले. त्यातून लाखो लिटर पाणी वाहू लागल्याने ऊस, बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देवांजळे तलाव फुटल्याने ऊस, बाजरी पिकांचे नुकसानअनेक ठिकाणचे पूल खचले : तहसीलदारांकडून नुकसानीची पाहणी

वाठार निंबाळकर : फलटण तालुक्यातील उपवळे, जाधवनगर, सावंतवाडा, दालवडी, दरेचीवाडी परिसरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी. यामुळे वांजळे तलाव मंगळवारी फुटले. त्यातून लाखो लिटर पाणी वाहू लागल्याने ऊस, बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे.उपळवे, जाधवनगर, सावंतवाडा, दालवडी येथे पावसाने बाजरी, कांदा, मका, डाळिंब आदी पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर बाणगंगा नदीलगतच्या सर्व विहिरी वाहून गेल्या आहेत. सावंतवाडा येथे बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पाच तासांसाठी गावचा संपर्क तुटला होता.दालवडी, मिरेवाडी रस्त्यावर बाणगंगा नदी पुलावरून पाणी वाहू लागले. यामुळे रस्ता वाहतूक बंद झाली. फलटण, उपवळे, सावंतवाडा या रस्त्यावरील मांडवखडक पूल खचून पुलाचे पाच लाख रुपयांचे नुकसान. दालवडी येथील डबचा ओढा पुलाचे पूल खचून पुलाचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.उपवळे येथे बाणगंगा नदी पुलाचे पूल खचून पाच लाख रुपयांचे नुकसान, दालवडी गावची नळपाणी पुरवठा योजनेची विहीर वाहून जाऊन विहीर व मोटार तसेच इतर साहित्यांचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. तहसीलदार हनुमंतराव पाटील, गटविकास अधिकारी गावडे, तालुका कृषी अधिकारी गोरक्षनाथ डोईफोडे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता महेश नामदे यांच्यासह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी तातडीने जेसीबी व इतर यंत्रणाच्या साह्याने रस्ता सुरू करून दिला. तहसीलदार हणमंतराव पाटील यांनी तातडीने पिके व इतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन प्रत्यक्षात पंचनामे सुरू केले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर