शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

उत्तरमांड धरणात पाणीसाठा करण्यास धरणग्रस्तांचा विरोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST

हणमंत यादव चाफळ : प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्तांचा विरोध असतानाही गमेवाडी येथील उत्तरमांड धरणाचे वक्री दरवाजे कृष्णा विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बंद ...

हणमंत यादव

चाफळ : प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्तांचा विरोध असतानाही गमेवाडी येथील उत्तरमांड धरणाचे वक्री दरवाजे कृष्णा विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बंद करत धरणात शंभर टक्के पाणीसाठा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे धरणग्रस्त संतप्त झाले आहेत. उत्तरमांड प्रकल्पग्रस्तांना देय असणाऱ्या जमिनी, गावठाणातील नागरी सोयीसुविधा आजही अपूर्ण असताना अधिकाऱ्यांनी शंभर टक्के पाणीसाठा करण्याचा अट्टहास घेतल्याने धरणग्रस्त संतप्त झाले आहेत.

गमेवाडी येथे उत्तरमांड नदीवर नाणेगाव बुद्रुक, माथणेवाडी गावांच्या सरहद्दीवर उत्तरमांड धरण उभारण्यात आले आहे. तत्कालीन शिवसेना-भाजपा युती शासनाच्या काळात मंजुरी मिळालेल्या या धरणाचे काम २०१० साली पूर्ण झाले आहे. धरण उदयास येऊन तब्बल चौदा वर्षे पूर्ण झाली आहेत. या चौदा वर्षांच्या संघर्षात मात्र आजही उत्तरमांड धरणात बाधित ठरलेल्या अनेक खातेदारांना शासनाने जमिनी दिल्या नाहीत. पुनर्वसन केलेल्या गावठाणात आजही अठरा नागरी सुविधांचा वणवा पेटलेला आहे. गेली चौदा वर्षे शासनदरबारी हेलपाटे मारूनही प्रकल्पग्रस्तांच्या पदरी निराशाच पडली आहे. असे असताना कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत येत असलेला लघुपाटबंधारे विभाग उत्तरमांड धरणात शंभर टक्के पाणीसाठा करण्याच्या तयारीत आहे. तशी पत्रं संबंधित गावच्या ग्रामपंचायतींना पाटबंधारे खात्याने पाठवलेली होती. यात उत्तरमांड धरणासाठी संपादित केलेल्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांचे असलेले विद्युतपंप काढून घेण्याचे नमूद केले आहे. तर याला धरणग्रस्तांनी कडाडून विरोध केला असून आमची थकीत देणी जोपर्यंत शासन देत नाही, तोपर्यंत धरणात शंभर टक्के पाणीसाठा करू नये तसेच पाणीसाठा केल्यास विद्युतपंप पाण्याखाली जाऊन निकामी होऊन शेतजमिनींना उन्हाळ्यात पाणी देता येणार नसल्याने पाणी अडवू नये, असे धरणग्रस्तांचे म्हणणे आहे.

वर्षानुवर्षे शासनाने उत्तरमांड धरणग्रस्तांचे मुश्कील केलेले जगणे आणि सरकार अन् प्रशासन नावाच्या यंत्रणेने केलेली दुर्दशा १४ वर्षांनंतरही संपली नाही. एका बाजूला पुनर्वसनाचा संघर्ष तर दुसरीकडे शेतीचे नुकसान होणार असल्याने प्रकल्पग्रस्त व्यथित झाले आहेत. त्यामुळे पाणी शंभर टक्के अडवू नये, असा पवित्रा धरणग्रस्तांनी घेतला आहे.

चौकट :

धरणग्रस्त संघटनेकडून पाठ...

चाफळ विभागातील उत्तरमांड धरणग्रस्तांना कोणी वाली उरला नाही. या धरणग्रस्तांचे नेतृत्व करण्यास कोणीही नाही. त्यामुळे धरणग्रस्त स्वत: यासाठी ताठ मानेने लढा देताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधी व धरणग्रस्त संघटनेने पाठ फिरवल्याने धरणग्रस्त एकटे पडले आहेत. प्रकल्पासाठी धरणग्रस्तांनी जमिनीसह घरादाराचा त्याग करूनही शेवटी पदरी निराशाच पडली आहे.

कोट...

धरण पूर्ण झाले आहे. मात्र, विभागात कोणतीच पाणीयोजना कार्यान्वित नाही. त्यामुळे स्वखर्चाने पदरमोड करून कर्ज काढून अनेक शेतकऱ्यांनी पाइपलाइन करत शेतजमिनीस पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी अडवल्यास मोटारपंप पाण्याखाली जाऊन शेत पिकांचे उन्हाळ्यात मोठे नुकसान होणार आहे. आजही पाडळोशी दाढोली खोऱ्यातील शेतजमिनींना या धरणाचे पाणी मिळेना, अशी अवस्था आहे. शेतकरी संघटनेने धरणग्रस्तांची पाठराखण करत शासनाकडे थकीत देणी देण्याबाबत प्रयत्न करावे.

- नितीन मसुगडे, सरपंच, नाणेगाव बुद्रुक