शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

गावोगावच्या शिवारात रोजचीच सापांची सळसळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:05 IST

संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : नागपंचमीला वारुळाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी नागाचे दर्शन व्हावे, ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : नागपंचमीला वारुळाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी नागाचे दर्शन व्हावे, अशी अनेकांची मनोमन इच्छा असते. अनेकवेळा ती पूर्ण होतेही. जिल्ह्यात पोषक अधिवास असल्याने येथे सर्पांच्या विविध जाती आढळून येतात. नागपंचमीलाच नव्हे तर एरव्हीही अनेकांना वारंवार सर्पांचे दर्शन होते. त्यातून येथील समृद्ध जैवविविधता अधोरेखित होते.प्रत्येकाच्या मनात सर्पाविषयी जेवढी भीती आहे, तेवढीच उत्सुकताही. त्यामुळे अनेकजण भीतभीत का होईना साप पाहायला धावतात. जिल्ह्यामध्ये सर्पांच्या अनेक जाती आढळतात. त्यामधील काही सर्प विषारी तर काही बिनविषारी आहेत. साप सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात. गोड्या तसेच समुद्राच्या पाण्यात, गवताळ व खडकाळ प्रदेशात, दलदलीजवळ, अडगळीत सापांचे वास्तव्य असते. काही साप झाडावर राहतात. या सापांचे वास्तव्य फांद्यांवर, झुडपांत व झाडांच्या ढोलीत असते. त्यांची शेपटी लांब असल्याने वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर येताना ते वरच्या फांदीस वेटोळे टाकून आपल्या शरीराचा पूर्ण भार पेलू शकतात. नद्या, तळी व नाले यांच्या आसपास आढळणाऱ्या सापांना पाणसर्प म्हटले जाते.त्यामध्ये विरोळा, पट्टेरी पाणसाप, पाणदिवड आदी सर्पांचा समावेश होता. या प्रकारचे सर्प जिल्ह्यात सर्वत्र पाणीसाठ्याच्या ठिकाणी आढळून येतात. साप कायम एकाच प्रकारच्या अधिवासात राहत नाहीत. पाणसर्प जमिनीवर किंवा जमिनीवरील साप पाण्यात आढळू शकतात. साप जमिनीवर बिळात राहतात; परंतु ते स्वत: बीळ तयार करीत नाहीत. मुंग्यांच्या वारुळात किंवा उंदीर व इतर प्राण्यांनी तयार केलेल्या बिळात ते राहतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागात गर्द वनराईमध्ये अनेक दुर्मीळ प्रकारच्या सापांचे अस्तित्व आहे.विषारी, बिनविषारी सापसापाच्या विविध जातींपैकी ठराविक सर्प विषारी तर अनेक सर्प बिनविषारी आहेत. धामण, दिवंड, पाणदिवंड, गवत्या, शेवाळी, कुकरी, तस्कर, कवड्या, मांडूळ, डुरक्या हे सर्प बिनविषारी आहेत. तर घोणस, फुरसे, मण्यार, पोवळा, नाग हे साप विषारी आहेत.सर्पांविषयीच्या गैरसमजुतीसर्पांविषयी अनेक गैरसमजुती आहेत. साप डूख धरतो, दूध पितो, हरणटोळी जातीचा साप डोक्यामध्येच दंश करतो, गर्भवती स्त्रीने सर्पाच्या डोळ्यात पाहू नये, नागांच्या डोक्यावर नागमणी असतो, रात्री शिट्टी वाजविल्यास साप घरामध्ये येतो.प्रमुख सर्पांची वैशिष्ट्येधामण : हा सर्प बिनविषारी असून, तपकिरी, शेवाळी, पिवळा किंवा काळ्या रंगामध्ये ती आढळते. हा सर्प अतिशय चपळ असून, डिवचला गेल्यास शरीर फुगवून हल्ला करतो.गवत्या : हिरव्या रंगाच्या या सर्पात खरखरीत खवले असतात. हा सर्प निशाचर आहे. तसेच तो बिनविषारी आहे. गवताळ किंवा पाणथळ जागेत तो हमखास आढळतो.घोणस : हा सर्प विषारी असून, याच्या शरीरावर तपकिरी किंवा त्यावर पांढरी किनार असलेल्या गडद तपकिरी गोल ठिपक्यांच्या तीन रांगा असतात. डिवचला गेल्यास हल्ला करतो.नाग : नाग विषारी असून तपकिरी, पिवळसर, राखाडी किंवा काळ्या रंगात तो आढळतो. फण्यामागे मोडी लिपीतील दहाचा आकडा असतो. वारूळ, पडक्या घरात वास्तव्य असते.