शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

चायनीज कूक बनला सायबर गुन्हेगार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:51 AM

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सेवानिवृृत्त महिलेला बँकेतून बोलत असल्याचे मोबाईलवरून सांगून एटीएमचा पासवर्ड घेऊन ५० हजारांची रोकड हातोहात लांबविणाºया युसूफ साहेबजान अन्सारी (रा. बगरुडिह, ता. करमाटांड, जि. जामतारा, झारखंड) याला पोलिसांच्या सायबर शाखेने अटक केली. विशेष म्हणजे पुण्याच्या चायनीज गाड्यावर आचाºयाचे काम करणाºया या युसूफची टोळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सेवानिवृृत्त महिलेला बँकेतून बोलत असल्याचे मोबाईलवरून सांगून एटीएमचा पासवर्ड घेऊन ५० हजारांची रोकड हातोहात लांबविणाºया युसूफ साहेबजान अन्सारी (रा. बगरुडिह, ता. करमाटांड, जि. जामतारा, झारखंड) याला पोलिसांच्या सायबर शाखेने अटक केली. विशेष म्हणजे पुण्याच्या चायनीज गाड्यावर आचाºयाचे काम करणाºया या युसूफची टोळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासात त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एका वृद्ध महिलेस २ आॅगस्ट रोजी एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्या व्यक्तीने स्टेट बँक आॅफ इंडियामधून बोलत असून, बँक खाते बंद करण्यात आले आहे. ते सुरू करण्यासाठी आधार कार्ड व तुमचे एटीएम कार्डचा नंबर सांगा, असे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संबंधित वृद्धेने सर्व माहिती दिली.त्यानंतर काही वेळांतच त्यांच्या बँकेच्या खात्यातून तब्बल ४९ हजार ९०० रुपये काढण्यात आले. हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक जी. एस. कदम यांच्या पथकाने तपास सुरू केला. युसूफ अन्सारीला अटक केली. त्याच्या अन्य साथीदारांसमवेत त्याने ही फसवणूक केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र, अद्यापही त्याचे साथीदार पोलिसांच्या हाती लागले नाहीत.या कारवाईमध्ये सायबर सेलचे महेश शेटे, शंकर सावंत, सचिन पवार, विक्रांत फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, वर्षा खोचे यांचा समावेश आहे.तिप्पट पगाराच्या आमिषाने आलायुसूफ हा पुण्यातील काळे नामक मराठी माणसाच्या चायनीज गाड्यावर आचारी म्हणून काम करत होता. फसवणूक झालेल्या महिलेच्या खात्यातील रक्कम ‘पेटीएम’ या अ‍ॅप्लिकेशनद्वारे युसूफने काळे याच्या खात्यात जमा केली. युसूफचा पत्ता झारखंडचा असल्याने त्याला पुण्यात स्वत:चे खाते उघडता आले नव्हते. त्यामुळे घरी पैसे पाठविण्यासाठी काळे यानेच पूर्वी स्वत:चे बँक खाते एटीएम कार्डसह युसूफला वापरायला दिले होते. ज्या खात्यात ५० हजार जमा झाले, त्याच्या पत्त्यावरून पोलिसांनी काळेला ताब्यात घेतले. या घटनेनंतर सहकाºयांसह युसूफ झारखंडला गेल्याचे काळे याने सांगितले. पोलिसांनी काळेलाच मोबाईलवर युसूफशी संपर्क साधण्यास सांगितले. पुण्यात दोन नवीन मोठे चायनीज हॉटेल सुरू करीत असून, त्यासाठी तिप्पट पगाराची नोकरी देण्यास तयार आहे, असे आमिष काळे याने दाखविताच युसूफ दोन-चार दिवसांतच पुण्यात आला अन् पोलिसांनी त्याला पकडले.