शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षात केस कापायला @ 50, फलटण तालुक्यात निर्णय : जीएसटीमुळं ग्राहकांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 15:53 IST

गेल्या वर्षी नोटाबंदी तर यावर्षी जीएसटीचीच चर्चा होती. या जीएसटीचा फटका सर्वसामान्यांना अप्रत्यक्ष बसतही आहे. हे हादरे अद्याप कमी झालेले नाही. जीएसटीमुळे सौंदर्यप्रसादनांचे दर परवडत नाहीत, असे कारण सांगून नवीन वषार्पासून सलूनच्या दरात वाढ करण्याचा निर्णय फलटण तालुक्यात घेण्यात आला. त्यामुळे १ जानेवारीपासून कटिंगला पन्नास तर दाढीला तीस रुपये मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्देसाधी कटिंग पन्नास, साधी दाढी तीस व कटिंग दाढी सत्तर रुपये दर निश्चित कमी दर घेईल त्याच्यावर संघटनेमार्फत दंडात्मक कारवाई निर्णय फलटण तालुक्यात, जीएसटीचा फटका

फलटण : गेल्या वर्षी नोटाबंदी तर यावर्षी जीएसटीचीच चर्चा होती. या जीएसटीचा फटका सर्वसामान्यांना अप्रत्यक्ष बसतही आहे. हे हादरे अद्याप कमी झालेले नाही. जीएसटीमुळे सौंदर्यप्रसादनांचे दर परवडत नाहीत, असे कारण सांगून नवीन वषार्पासून सलूनच्या दरात वाढ करण्याचा निर्णय फलटण तालुक्यात घेण्यात आला. त्यामुळे १ जानेवारीपासून कटिंगला पन्नास तर दाढीला तीस रुपये मोजावे लागणार आहेत.गोखळी येथे फलटण तालुक्यात नाभिक आरक्षण फाउंडेशनची बैठक झाली. या बैठकीत नवीन वषार्पासून सलून दरवाढ करण्याचा सवार्नुमते निर्णय घेण्यात आला.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल पवार, उपाध्यक्ष नवनाथ काशीद, गणेश काशीद, सचिव नंदकुमार काशीद, पोलिस पाटील किसनराव काशीद, योगेश पवार, जिल्हा संपर्क प्रमुख धनंजय राऊत, सचिव सुधीर कर्वे, जिल्हा संघटक रामदास काशीद, गणेश कर्वे, राजेंद्र काशीद, सचिन राऊत उपस्थित होते.यावेळी सलून व्यवसायिकांना सलूनमधील सौंदर्यप्रसादनांसह इतर वस्तूंचे दर जीएसटीमुळे वाढल्याने जुन्या दरानुसार काम करणे परवडत नाही. याबाबत उपस्थित सलून व्यवसायकांनी मते मांडल्याने चर्चा करुन नवीन वषार्पासून संघटनेचे नवीन दरपत्रक प्रसिद्ध करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला.

यामध्ये नवीन वषार्पासून साधी कटिंग पन्नास, साधी दाढी तीस व कटिंग दाढी सत्तर रुपये दर निश्चित करण्यात आले. नवीन दरपत्रकाप्रमाणे सर्व सलूनधारकांनी दर घ्यावेत, जो कमी दर घेईल त्याच्यावर संघटनेमार्फत दंडात्मक कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला.नाभिक समाजबांधवांनी एकत्र येऊन संत सेना महाराज पुण्यतिथीला अभिवादन करणे, वधू-वर मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी विशाल पवार, किसनराव काशीद यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस मठाचीवाडी, राजुरी, गुणवरे, निंबळक, वाजेगाव, बरड, साठे, राजाळे, पिप्रंद, पवारवाडी, विडणी, हनुंमतवाडी, आसू, गोखळी, मेखळी, मुजंवडी आदी गावातील समाज बांधव उपस्थित होते. धनंजय राऊत यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार काशीद यांनी आभार मानले 

टॅग्स :GSTजीएसटीSatara areaसातारा परिसर