शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक विभागाकडून मार्चपर्यंत राज्यात १२०० कार्यक्रम होणार; मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

By नितीन काळेल | Updated: June 11, 2025 21:54 IST

साताऱ्यातील शाहिरी महोत्सवाचा समारोप 

- नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्याची माती पराक्रम, त्याग, बलिदान आणि समर्पित वृत्तीची आहे. हा परिसर समृध्द, संपन्न असून कला व संस्कृती जपणाराही आहे. त्यामुळे साताऱ्यात शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आता सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने मार्च महिन्यापर्यंत राज्यात १ हजार २०० कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली.

साताऱ्यातील शाहू कला मंदिरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित शाहिरी महोत्सवाच्या समारोपात मंत्री शेलार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, आमदार मनोज घोरपडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी नीलेश धुमाळ, भाजप प्रदेश सांस्कृतिक आघाडी सदस्य पंकज चव्हाण, शिरीष चिटणीस आदी उपस्थित होते.

मंत्री आशिष शेलार म्हणाले, आक्रमणे ही युध्दाच्या रुपाने येतात. पण, एेतिहासिक प्रथा, परंपरा, संस्कृती जीवंत राहते तोच देश टिकतो. त्यामुळे सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने विविध कार्यक्रम होत असतात. आता मार्च महिन्यापर्यंत चित्रपट, कला, संस्कृती, लोककलांचे १ हजार २०० कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शाहिरी ही उर्जा आणणारी कला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळापासून शाहिरीला सुरूवात झाली. राष्ट्रनिर्मितीतही शाहिरांचे मोठे योगदान राहिले. तर महाराष्ट्राच्या निर्मितीवेळच्या संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्यावेळी शाहिरांनी दिलेले योगदानही आपणाला विसरता येत नाही.जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासात शाहिरांचे योगदान मोठे आहे. शहरांचा विकास सांस्कृतिकही असावा. साताऱ्यात शाहिरी महोत्सव झाला. याला सातारकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

            लोककला जपल्या पाहिजेत. त्यामुळे शासन त्यांना राजाश्रय देण्याचा प्रयत्न करत आहे. डिजीटल क्रांतीत मात्र, लोककला लोप पावत आहेत. ही संस्कृती आणि आपला इतिहास लोकांसमोर जाण्यासाठी शाहिरीही टिकायला हवी, असे आमदार मनोज घाेरपडे यांनी सांगितले.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलार