शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुसवडेत गांजाची लागवड; नागठाणेत विक्री, बोरगाव पोलिसांची धडक कारवाई

By दत्ता यादव | Updated: October 29, 2023 18:49 IST

सहा किलो गांजा हस्तगत

सातारा : बोरगाव पोलिसांनी एकाच दिवशी दोन ठिकाणी गांजा लागवड आणि विक्रीच्या ठिकाणी छापा टाकून दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे १ लाख ५६ हजार रुपये किमतीचा तब्बल ६ किलो ३५० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी सायंकाळी केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांना खबऱ्याकडून गांजाची लागवड आणि विक्रीसंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पथक तयार करून स्वत: कारवाईसाठी रवाना झाले. कुसवडे, ता. सातारा या गावातील अशोक पांडुरंग पवार याने त्याच्या राहत्या घराजवळ गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ५ किलो १३० ग्रॅम वजनाचा एकूण १ लाख २८ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईनंतर पोलिसांनी आपला मोर्चा नागठाणे येथे वळवला. 

या ठिकाणी अमोल आण्णा मोहिते हा त्याच्या घराजवळ गांजाची विक्री करत होता. पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून १ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एका गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक वर्षा डाळिंबकर तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजाराम निकम हे करीत आहेत.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, हवालदार अमोल सपकाळ, दादा स्वामी, सुनील कर्णे, दीपक मांडवे, प्रशांत चव्हाण, नम्रता जाधव, संजय जाधव, दादा माने यांच्यासह फाॅरेन्सिक युनिटच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.

श्वानाकडूनही महत्त्वाची कामगिरी

नागठाणे येथे घरात गांजा शोधताना श्वानाने महत्त्वाची कामगिरी बजावली. गांजा नेमका कुठे लपवून ठेवला, हे श्वानाने शोधून काढलं. त्यानंतर पोलिसांनी घरातून गांजा हस्तगत केला. एका पोत्यामध्ये हा गांजा ठेवण्यात आला होता.  

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर