शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

महाबळेश्वरमध्ये हुडहुडी वाढली, थंडीमुळे पर्यटकांची संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 12:13 IST

महाबळेश्वर : मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आठ दिवसांपासून तापमानात ...

महाबळेश्वर : मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आठ दिवसांपासून तापमानात घसरण होऊ लागल्याने थंडीचा कडाका वाढू लागला आहे. या कडाक्याच्या थंडीसोबतच गार वारेही वाहू असल्याने पर्यटनास आलेल्या पर्यटकांसह स्थानिक नागरिक थंडीत गारठले आहेत.महाबळेश्वर शहरामध्ये किमान १२ ते १४ अंश तापमानाची नोंद होत असून, वेण्णा लेक परिसरात त्याहून तापमानाची कमी नोंद होत असते. थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने सकाळी वेण्णा लेकवर पर्यटक अपवादानेच फिरकत आहेत. कडाक्याची थंडी ही महाबळेश्वरची नजाकत दाखवत असून, या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे. महाबळेश्वर सोडून काही किलोमीटर अंतर सोडून गेल्यावर बोचरी थंडी व महाबळेश्वरमध्ये असलेली गुलाबी थंडी यातील फरक पर्यटक अनुभवत आहेत. सायंकाळी पर्यटकांसह स्थानिकही थंडीपासून बचाव होण्यासाठी स्वेटर, कानटोपी, जॅकेट्सचा आधार घेताना पाहावयास मिळत आहेत. लिंगमळासह शहरातील विविध भागांमध्ये स्थानिकांसह पर्यटक हे शेकोटी पेटवताना पाहावयास मिळत आहेत.

सातारा जिल्ह्यात थंडीचा वाढला जोर; पारा १५ अंशाखालीच !जिल्ह्यात मागील आठवड्यापासून थंडीचा जोर असून शहरांसह ग्रामीण भागही गारठला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेकाेट्या पेटू लागल्यात. तर सातारा शहराचा पारा मागील काही दिवसांपासून १५ अंशाच्या खाली कायम आहे.जिल्ह्यात यावर्षी थंडीला उशिरा सुरूवात झाली. दरवर्षी नोव्हेंबरला सुरूवात होण्यापूर्वीच थंडीची चाहूल लागते. पण, यंदा नोव्हेंबर महिना अर्धा संपल्यानंतर थंडी पडण्यास सुरूवात झाली. मागील काही दिवसांपासून तर पारा सतत खाली जात चालला आहे. त्यामुळे लोकांच्या जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. आठवड्यातच किमान तापमान १५ अंशाच्या खाली गेले आहे. परिणामी शेतीच्या कामावरही परिणाम झालेला आहे. तर सातारा शहराचा पारा मागील आठ दिवसांपासून उतरत गेला आहे. यामुळे शहरवासीयांना ही थंडीचा सामना करावा लागतोय.

सातारा शहरातील किमान तापमान..१८ नोव्हेंबर १६.८, १९ नोव्हेंबर १४.७, २० नोव्हेंबर १४.५, २१ नोव्हेंबर १३.६, २२ नोव्हेंबर १३.७,२३ नोव्हेंबर १४.२, २४ नोव्हेंबर १४.५ आणि २५ नोव्हेंबर १३.८

महाबळेश्वरचे तापमानदि. १८ नोव्हेंबर १३.४, १९ नोव्हेंबर १३.८, २० नोव्हेंबर १३.२, २१ नोव्हेंबर १३.६, २२ नोव्हेंबर १४, २३ नोव्हेंबर १३.८, २४ नोव्हेंबर १३.९ आणि २५ नोव्हेंबर १२

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानTemperatureतापमान