शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

धारेश्वरला भाविकांसह पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 16:06 IST

मल्हारपेठ (जि. सातारा) : निसर्गाच्या कुशीत प्रति काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटण तालुक्यातील धारेश्वर येथे  पर्यटकांची गर्दी वाढत आहे. श्रावणी सोमवारी येथे देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

ठळक मुद्देपर्यटकांसाठि निसर्गरम्य ठिकाण बारमाही धबधबा ठरतोय आकर्षणपाटणपासून १८ किलोमीटरवर निसर्गाच्या सानिध्यात धारेश्वरदेवस्थान परिसरात अनेक पवनचक्क्या

मल्हारपेठ (जि. सातारा) : निसर्गाच्या कुशीत प्रति काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाटण तालुक्यातील धारेश्वर येथे  पर्यटकांची गर्दी वाढत आहे. श्रावणी सोमवारी येथे देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यावर पाटणपासून १८ किलोमीटरवर निसर्गाच्या सानिध्यात धारेश्वर हे ठिकाण आहे. त्यास प्रतिकाशी समजले जाते. श्रावण महिन्यासह बारमाही गर्दीमुळे धारेश्वर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध होऊ लागले आहे. नुकताच देवस्थानापर्यंत रस्ता झाला आहे.

नवीन महाबळेश्वरच्या दुर्गम पट्टयात हे ठिकाण येते. कोकणातून येताना चिपळूण मार्गे कुंभार्ली घाटातून पाटणमार्गे तर पुण्याकडून येताना उंब्रज मार्गे आणि कोल्हापूरकडून येताना कºहाडमार्गे धारेश्वरला जाता येते. पाटण ते धारेश्वर हा मार्ग अतिशय निसर्गरम्य आहे.

देवालयाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण उंच महाबळेश्वरच्या उंचीला येऊन पोहचतो. महाबळेश्वरला जाताना डाव्या, उजव्या बाजूला जंगलामुळे निसर्गाची भयानकता जाणवते. धारेश्वरला जाताना जणू थंड हवेच्या ठिकाणी गेल्याचा अनुभव येतो. निसर्ग पर्यटक व चित्रपट निर्मात्यांनाही हे ठिकाण खुणवत आहे.

देवस्थान सह्याद्री डोंगरात अंदाजे १०० मिटर लांब व ५० मिटर रुंद पोखरलेल्या गुहेत आहे. मंदीराच्या प्रवेशद्वारावरून बारमाही विरळ धबधबा वाहतो. येथे दगडी शिर असून त्यातून हवेचे लहानसे फुगे बाहेर पडतात. हे फुगे जास्त प्रमाणात असल्याने ते दुधाळ दिसतात. त्याला दूध गंगा असेही  म्हटले जाते. येथे बारमाही धबधब्याच्या धारा कोसळतात. धारेश्वर देवस्थानचा उल्लेख सहाव्या शतकातील साहित्यापर्यंत आढळतात. आज तिथे ३१ वे शैवपंथीय गुरू कार्यभार पाहतात. गुहेत आणखी एक गुहा

देवस्थानाच्या गुहेमध्ये अंतर्गत एक गुहा आहे. या गुहेत काही प्राचिन वस्तू असून एक पितळी पंचारतीही आहे. त्याला भिताची पंचारती असे म्हटले जाते. ही पंचारती दोन्ही हातांनीही उचलता येत नाही, एवढी जड आहे. या देवस्थान परिसरात अनेक पवनचक्क्या असून त्या पाहण्यासाठीही पर्यटक गर्दी करतात.