शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धेला गर्दी, शेतक-यांमध्ये उत्साह, ३० ट्रॅक्टरचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 22:41 IST

बैलगाडी शर्यतीवर बंदी असल्याने शेतकरीवर्गासह चालक-मालक व प्रेक्षकांच्यात यात्रा काळात प्रचंड नाराजी होती. मात्र, यावर तोडगा म्हणून यावर्षी गणेश मंडळे, ज्योतिर्लिंग यात्रा कमिटीतर्फे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांबरोबरीने रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले. 

वडूज: बैलगाडी शर्यतीवर बंदी असल्याने शेतकरीवर्गासह चालक-मालक व प्रेक्षकांच्यात यात्रा काळात प्रचंड नाराजी होती. मात्र, यावर तोडगा म्हणून यावर्षी गणेश मंडळे, ज्योतिर्लिंग यात्रा कमिटीतर्फे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांबरोबरीने रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले. 

 बहुतांशी कुटुंबाचे कुलदैवत असलेले श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने या यात्रा काळातील खास आकर्षण ठरले ते रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धा. या स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकरी  ट्रॅक्टर चालकांनी हजेरी लावून स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला, तर वडूजकरांना ही स्पर्धा म्हणजे एक क्रीडा क्षेत्रातील पर्वणीच ठरली. बैलगाडीची शर्यत बंद झाल्याने शेतकरी वर्ग नाराज झाला होता. मात्र, रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धेमुळे पुन्हा शेतक-यांचा उत्साह द्विगुणीत झाला.

  या स्पर्धेत क-हाड, ओगलेवाडी, सदाशिवगड, बाबरमाची, सैदापूर, राजमाची, कार्वे, सुपने, कोरेगाव, वाकेश्वरसह वडूज पंचक्रोशीतील सुमारे तीस ट्रॅक्टर चालकांनी सहभाग नोंदविला होता. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या स्पर्धेत ट्रॅक्टर चालकांची कसब वाखणण्याजोगी होती. चार चाकोरीमधून सुमारे साडेसहाशे फूट अंतर ट्रॅक्टरचा रिव्हर्स गिअरमधून चालविण्याची अवलिलया चालकांची कला उपस्थितींच्या डोळ्यांचे पारणे फेडत होती. सायंकाळी उशिरा पार पडलेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक २५ हजार रुपयांचे मानकरी वाकेश्वरचे नामदेव फडतरे, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १५ हजार रुपये क-हाडचे योगेश डुबल तर तृतीय क्रमाकांचे १० हजार रुपयांचे विजेते वडूजचे डॉ. संतोष गोडसे हे ठरले. या स्पर्धेतील विजेत्यांना यात्रा कमिटीच्या वतीने मानाचा फेटाही बांधण्यात आला.

  या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमुळे शेतकरी वर्गात नवचैतन्य निर्माण झाले असून, येथून पुढील यात्रा काळात अशा प्रकाराच्या स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, बुधवार दि. ४ एप्रिल रोजी कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले असून, वडूज पंचक्रोशीतील मल्लांनी व कुस्तीप्रेमींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर