शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसेवा केंद्रांचे कोट्यवधी रखडले, शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज भरून दोन महिने झाले

By दीपक देशमुख | Updated: October 5, 2023 14:27 IST

सातारा जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार १६५ शेतकऱ्यांनी भरला विमा

दीपक देशमुखसातारा : खरीप हंगामातील पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून केवळ एक रुपया घेण्यात आला. उर्वरित पीक विम्याचे पैसे शासन भरणार होते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा एक रुपया देऊन सीएससी चालकांनी भरून घेतला. यासाठी सामान्य सेवा केंद्रांना प्रत्येक विम्यासाठी ४० रुपये शुल्क देण्याचे ठरले होते. परंतु, दाेन महिने झाले तरी हे पैसे या केंद्रांना अद्याप मिळालेले नाहीत. १२६१ चालकांचे तब्बल १ कोटी १० लाख ४६ हजार ६०० रुपये रखडले असून ही रक्कम लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी होत आहे.

शासनाने बाह्यस्रोताद्वारे अनेक शासकीय कामे करण्यासाठी सेतू कार्यालये, सीएससी सेंटर सुरू केली आहेत. यातून हजारो युवकांना रोजगारही मिळत आहे. परंतु, त्यांची बिले महिना-महिना रखडत असल्याने आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील सीएससी केंद्र चालकांनाही याचा फटका बसला आहे.महाराष्ट्रात या वर्षीपासून राज्य सरकारने सर्वसमावेशक पीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार सीएससी चालकांनी शेतकऱ्यांकडून १ रुपया घेऊन पीक विमा भरून घेतला. मात्र, सीएससी चालकांना पैसे दिले नाहीत. जिल्ह्यात एकूण ४२८७ सीएससी आहेत. यापैकी आजघडीला १२६१ केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांवरून २ लाख ७६ हजार १६५ शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. त्यापोटी १ कोटी १० लाख ४६ हजार ६०० इतकी रक्कम सीएससी चालकांना देय आहे. ३ ऑगस्टला विमा भरण्याचे काम पूर्ण झाले. आत दोन महिने झाले तरी ही बिले अद्याप अदा करण्यात आली नाहीत.

२ लाख ७६ हजार १६५ शेतकऱ्यांनी भरला विमाजिल्ह्यात २ लाख ७६ हजार १६५ शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केला आहे. यामुळे १ लाख १० हजार ८२९ हेक्टरवरील पिके संरक्षित झाली आहेत. तथापि, १ कोटी १० लाख ४६ हजार ६०० इतकी रक्कम रखडली आहे. त्यामुळे लवकरात लवकर बिल मिळावे, अशी मागणी सीएससी चालकांकडून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी