शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ग्राउंड रिपोर्ट: वाटाणा सडला; शेतकरी रडला!, अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील पिकांना मोठा फटका

By नितीन काळेल | Updated: September 4, 2025 15:59 IST

रानाचं झालं तळं; पिकाचा चिखल; उत्पन्न शून्य

नितीन काळेलसातारा : दरवर्षीच वाटाणा पीक घेतो. त्यातच महाबळेश्वरच्या वाटाण्याला मुंबईच्या बाजारातही चांगली मागणी. त्यामुळे उत्पन्नही चांगले मिळते; पण यावर्षी सतत पाऊस असल्याने उगवणीलाच वाटाण्यात पाणी साचले. त्यातच अजूनही पाऊस सुरू असल्यानं जमिनीचं तळं अन् पिकाचा चिखल झालाय. त्यामुळे वाटाणा कुजल्याने उत्पन्न मिळणार नाहीच. यातून वर येण्यासाठी शासनानेच तातडीने मदत करावी, अशी आर्त हाक आंब्रळ येथील शेतकरी दिलीप आंब्राळे यांनी दिली आहे.महाबळेश्वर तालुका तसा डोंगर, चढ-उताराचा. तरीही येथील शेतकरी विविध पिके घेऊन समृद्ध होण्याची स्वप्ने पाहतात. येथील स्ट्राॅबेरी जशी प्रसिद्ध तसेच वाटाण्यालाही मागणी राहते. त्यामुळे शेतकरी वाटाणाही लावून मुंबईची बाजारपेठ गाठतात; पण यावर्षी महाबळेश्वर तालुक्यात सतत पाऊस आहेच. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर सतत तीन दिवस अतिवृष्टी झाली. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला. यामध्ये दिलीप आंब्राळे यांचाही समावेश आहे.दिलीप आंब्राळे यांची एकूण १२ ते १३ एकर शेती आहे. यामध्ये ते स्ट्राॅबेरी पिकवतात. त्याचबरोबर वाटाणा हे पीकही घेतात. यावर्षीही त्यांनी वाटाणा घेतला; पण उगवणीलाच दणका बसला. त्यातून पुन्हा उभा राहणे शक्य नाही. कारण, सततचा पाऊस आणि पाणी साचल्याने वाटाणा खालील बाजूने कुजलाय. पाऊस कायम राहिल्यास पीक पूर्ण कुजणार आहे.दिलीप आंब्राळे सांगत होते, यावर्षी दोन एकर वाटाणा केला होता. त्यासाठी १४० रुपये किलोने ८० किलो बियाणे आणले. लागवडीनंतर उगवणीलाच पाऊस सुरू झाला. दोन दिवस अतिवृष्टी झाली. जमिनीत पाणी साचले. त्यातच आताही सतत पाऊस पडतोय. त्यामुळे वाटाणा बघायला गेलो तर खालून सडू लागल्याचे दिसत आहे. आता वाटाणा हाती येणारच नाही. त्यामुळे माझ्याबरोबरच अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.दरम्यान, ही व्यथा एकट्या दिलीप आंब्राळे यांची नाही तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची झालेली आहे. यासाठी पंचनामे झालेल्या क्षेत्रासाठी लवकर मदत शासनाकडून मिळावी, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

अतिवृष्टीचा १९९ शेतकऱ्यांना फटका; त्यामधील ११२ महाबळेश्वरमधील..ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सातारा, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यांतील शेतीपिकांचे नुकसान झाले. प्रशासनाकडील नोंदीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १९९ आहे. यामधील ११२ शेतकरी हे महाबळेश्वर तालुक्यातील आहेत.

यावर्षी सतत पाऊस आहे. वाटाण्याला फटका बसला. त्यामुळे उत्पन्नाची आशा संपलेली आहे. तसेच आता पावसामुळे स्ट्राॅबेरी लागवडही काही दिवस पुढे जाणार आहे. त्यामुळे त्याचा स्ट्राॅबेरीच्या उत्पादनावर परिणाम होईल. सततच्या पावसामुळे यावर्षी नुकसान सोसावे लागणार आहे. - दिलीप आंब्राळे, शेतकरी