शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : विश्वजीत कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 16:25 IST

Farmar, Vishwajeet Kadam, Satara area अतिवृष्टीमुळे बळीराजाचे शेतातील पीक व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. माण तालुक्यातील देवापूर, पळसावडे व जांभुळणी येथील डाळींब, द्राक्ष व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

ठळक मुद्देपिकांच्या नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : विश्वजीत कदम देवापुर, पळसावडे, जांभुळणी येथील पिकांची पाहणी

म्हसवड : अतिवृष्टीमुळे बळीराजाचे शेतातील पीक व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. माण तालुक्यातील देवापूर, पळसावडे व जांभुळणी येथील डाळींब, द्राक्ष व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुुळे दुष्काळी माण तालुक्यातील पूर्व भागाला मोठा फटका बसला. या पावसात माण तालुक्यातील बळीराजाची हातातोंडाशी आलेली पिके उध्वस्त झाली तर फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. त्या नुकसानीची कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

देवापूर व पळसावडे परिसरातील फळबागा पावसाने उध्वस्त झाल्या आहेत. कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे. या पिकांची राज्यमंत्री कदम यांनी पाहणी करतानाच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.गेल्या चार वर्षांपासून दुष्काळग्रस्त असणाऱ्या माण तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांना केली. मंत्री कदम यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रकांत सानप यांना केल्या.यावेळी महाराष्ट्र कॉँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलासराव ओताडे, सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. विजय जाधव, काँग्रेस सेवादल सातारा जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पिसाळ, दादासाहेब काळे, विजय धट, प्रा. विश्वंभर बाबर, भीमराव काळेल, विकास गोजारी, बाबासाहेब माने, अनिल लोखंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीVishwajeet Kadamविश्वजीत कदमSatara areaसातारा परिसर