शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

तुंबळ मारामारी करणाऱ्यांवर शांतता भंग केल्याचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 18:13 IST

सातारा येथील राजलक्ष्मी थिएटरसमोर दोन गटांत तुंबळ मारामारी करणाऱ्या युवकांनी एकमेकांविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याने अखेर पोलिसांनी संबंधित युवकांवर सार्वजनिक ठिकाणी शांतेचा भंग केल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल केला.

ठळक मुद्देतुंबळ मारामारी करणाऱ्यांवर शांतता भंग केल्याचा गुन्हाआपापसात वाद मिटल्याने अखेर पोलिसांकडून फिर्याद

सातारा : येथील राजलक्ष्मी थिएटरसमोर दोन गटांत तुंबळ मारामारी करणाऱ्या युवकांनी एकमेकांविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याने अखेर पोलिसांनी संबंधित युवकांवर सार्वजनिक ठिकाणी शांतेचा भंग केल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल केला.सोहेल निसार बागवान (वय २९), साजिद निसार बागवान (वय ३२), मोहसीन निसार बागवान (सर्व रा. समता पार्क, शाहूपुरी सातारा), आरबाज नईम शेख (वय २८, रा. गुरुवार पेठ, सातारा), हर्षद नईम शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, राजलक्ष्मी थिएटरसमोर बुधवारी सायंकाळी पाच वाजता युवकांच्या दोन गटांत तुंबळ मारामारी सुरू होती.

लाकडी दांडक्याने एकमेकांना मारहाण करण्यात येत होती. यावेळी वाहतूक पोलीस सोमनाथ शिंदे हे तेथून जात असताना त्यांच्या हा प्रकार निर्दशनास आला. त्यांनी संबंधित युवकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित युवक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर शिंदे यांनी शर्तीचे प्रयत्न करून एकट्याने तिघांना ताब्यात घेतले. मात्र, काहीजण पळून गेले. भर रस्त्यातच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली होती.दोन्ही गटांतील युवक एकमेकांच्या ओळखीचे असल्यामुळे त्यांनी मारहाणीची तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव संबंधित युवकांवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा लागला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर