शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तलवार, कोयत्याने वार करणाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 16:41 IST

सातारा : विसावा नाका परिसरात तलवार आणि कोयता घेऊन शुक्रवारी भरदुपारी दहशत माजविणाऱ्या आणि एका युवकावर वार करणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी ...

ठळक मुद्देतलवार, कोयत्याने वार करणाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हापूर्वीच्या वादातून कृत्य ; पोलिसांकडून धरपकड सुरू

सातारा : विसावा नाका परिसरात तलवार आणि कोयता घेऊन शुक्रवारी भरदुपारी दहशत माजविणाऱ्या आणि एका युवकावर वार करणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.अमिर शेख (रा. वनवासवाडी, सातारा), आयुष भिसे, ओंकार भिसे, आकाश पवार, गोट्या जाधव, शुभम बगाडे (सर्व रा. मोळाचा ओढा, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, गुन्हा दाखल झालेले वरील सहाजण शुक्रवारी दुपारी विसावा नाका परिसरातून हातात तलवार, कोयता घेऊन आले.

वाटेत त्यांनी एका कारची आणि दोन दुचाकींचीही तोडफोड केली. त्यानंतर या युवकांनी उमेश आप्पाराव गायकवाड (वय २४, रा. लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी, सदर बझार सातारा) याच्यावर तलवार अन् कोयत्याने वार केले. तसेच त्याच्या खिशातील पैसे आणि गळ्यातील चेनही हिसकावून त्यांनी पलायन केले.

या प्रकारानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनी तत्काळ जखमी उमेश गायकवाडकडून महिती घेऊन संबंधितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला.

उमेश गायकवाड आणि वरील संशयितांची वर्षेभरापूर्वी मारामारी झाली होती. दरम्यान, उमेश हा शुक्रवारी दुपारी सदर बझारमधील शिवांजली सोसायटीमध्ये राहात असलेल्या आपल्या भावाकडे आला होता. तो इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ दिसताच संशयितांनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर तेथून ते पसार झाले. पूर्वीच्या वादातूनच उमेशवर संबंधितांनी वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी संशयित आरोपींची धरपकड सुरू केली असून, तिघाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर